महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Clubhouse Controversy बेंगळुरूमध्ये पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा, पोलिसांकडून गुन्हा दाखल

पाकिस्तान जिंदाबाद इंडिया मुर्दाबाद अशी टॅगलाईन Pakistan Zindabad India Murdabad असलेल्या क्लब हाऊस या सोशल मीडिया अ‍ॅपवर ग्रुप मीटिंगचे स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर बेंगळुरू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बैठकीत लोकांना पाकिस्तानचा झेंडा डीपी म्हणून वापरण्याचे आवाहन करण्यात आले होते.

clubhouse controversy
बेंगळुरूमध्ये पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा

By

Published : Aug 18, 2022, 4:40 PM IST

बेंगळुरू सोशल मीडिया क्लबहाऊस ग्रुपमध्ये social media clubhouse group पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावून भारताचा अनादर Disrespect of India केल्याच्या गंभीर आरोपाखाली बेंगळुरूच्या संपीगेहल्ली पोलीस ठाण्यात Sampigehalli Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेंगळुरूमध्ये पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल डीपीवर पाकिस्तानचा झेंडा लावण्यासाठी प्रोत्साहित ही घटना 14 ऑगस्ट रोजी घडली. बदमाशांनी प्रत्येकाला त्यांच्या डीपीवर पाकिस्तानचा झेंडा लावण्यासाठी प्रोत्साहित केले. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे Video Viral On Social Media . पाकिस्तान झिंदाबाद भारत मुर्दाबाद अशी टॅगलाइन असलेली क्लब हाऊस या सोशल मीडिया अ‍ॅपवर ग्रुप मीटिंग त्यांच्यासोबत शेअर करण्यात आली आहे. बैठकीत लोकांना पाकिस्तानचा झेंडा डीपी म्हणून वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

पोलिसांकडून तपास सुरू यावर प्रतिक्रिया देताना शहर पोलीस आयुक्त प्रताप रेड्डी म्हणाले, "डीपीमध्ये पाकिस्तान समर्थक राष्ट्रध्वज लावण्यात आल्याचे वास्तव आमच्या निदर्शनास आले आहे. तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. क्लबहाऊसच्या सदस्यांनी हा गुन्हा केला आहे. त्यांच्या खर्‍या नावाऐवजी टोपण नाव वापरत आहे. त्याबद्दलची सर्व माहिती गोळा केली आहे. संपीगेहल्ली पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सेवा पुरवठादाराची माहितीही विचारली आहे. आम्हाला काही माहिती मिळाली आहे आणि त्याची चौकशी करत आहोत, असे पोलीस म्हणाले आहेत.

हेही वाचाPune MHADA Lottery पुण्यात म्हाडाच्या ५२११ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा आज शुभारंभ

ABOUT THE AUTHOR

...view details