नवी दिल्ली : राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी यांना काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी चांगलेच फटकारले आहे. उत्तर प्रदेशच्या बदायूंमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी चंद्रमुखी यांनी जे वक्तव्य केले, त्याबाबत गांधी यांनी देवींवर टीका केली आहे. संबंधित महिलेवर मंदिरात सामूहिक बलात्कार करुन तिला जबर मारहाण करण्यात आली होती. त्यावर; ती महिला एकटी मंदिरात गेली नसती, तर असे काही झालेच नसते असे बेजबाबदार वक्तव्य देवी यांनी केले होते.
देशातील महिला कशा सुरक्षित समजाव्या?
महिला आयोगाच्या सदस्यांनीच अशा प्रकारची वक्तव्ये केली, तर देशातील महिला कशा सुरक्षित समजाव्यात? आयोगाच्या सदस्या या झालेल्या प्रकारासाठी पीडितेलाच दोष देत आहेत. तसेच, या प्रकरणातील पिडितेचा शवविच्छेदन अहवाल लीक झाल्यामुळे प्रशासन नाराज आहे. सध्या पीडिता रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. देशातील महिला अशा प्रकारची वक्तव्ये कधीच माफ करणार नाहीत, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
काय म्हणाल्या होत्या देवी?