बिजनौर (उत्तर प्रदेश) - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहेत. यातच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. चांदपूरमध्ये त्यांनी किसान पंचायतीला संबोधीत केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: साठी दोन विमान खरेदी करण्यासाठी 16 हजार कोटी खर्च केले. त्या पैशातून शेतकर्यांचे संपूर्ण ऊस देय देणे शक्य झाले असते, असे त्या म्हणाल्या.
पंतप्रधान मोदींकडे प्रवासासाठी पैसे आहेत. शेतकऱ्यांसाठी नाही. नव्या कृषी कायद्यांमुळे भांडवलदार त्यांचे भांडार भरू शकतील. पण शेतकऱयांना किमान आधारभूत किंमतही मिळणार नाही, असे त्या म्हणाल्या. जे देवाचाही सौदा करतात त्यांना माणसांची काय किंमत? ऊसाची पैसे देऊ शकत नाही त्यांना जीवाचं मोल काय कळणार, असा घणाघात त्यांनी केला.