नवी दिल्ली : नवी दिल्लीतील राजघाटावर राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आयोजित निदर्शनात काँग्रेस नेत्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की, माझ्या शहीद वडिलांचा संसदेत अपमान झाला आहे. शहीदाच्या मुलाचा अपमान झाला आहे. माझ्या आईचा देखील अपमान झाला. तुमचे मंत्री म्हणतात की त्यांचा बाप कोण? तुमचे पंतप्रधान तर गांधी घराण्याला म्हणतात की आम्ही नेहरू आडनाव का वापरत नाही? पण तुमच्यावर कोणताही खटला भरवला जात नाही. तुमचे सदस्यत्व रद्द होत नाही.
'माझ्या कुटुंबाने देशासाठी रक्त सांडले' :त्या पुढे म्हणाल्या की, तुम्ही आम्हाला परिवारवादी म्हणता, मग प्रभू राम कोण होते? ते परिवारवादी होते का? पांडव कुटुंबवादी होते का? आणि या देशासाठी आमचे कुटुंबीय शहीद झाले याची लाज वाटावी का? माझ्या कुटुंबाने या देशाची भूमी, या देशाच्या ध्वजासाठी आपले रक्त सांडले आहे. याची मला लाज वाटली पाहिजे का? त्या म्हणाल्या की, माझ्या कुटुंबाने या देशातील लोकशाहीसाठी रक्ताचे पाणी केले आहे.
'पंतप्रधान भित्रे आहेत' :अदानी आणि हिंडेनबर्गच्या अहवालाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, अदानीमध्ये असे काय आहे की तुम्ही सर्वजण त्यांना वाचवण्यात व्यस्त आहात. अदानी यांची चौकशी का होऊ शकत नाही? त्या म्हणाल्या की, राहुल गांधींनी दोन प्रश्न विचारले असता, त्यांना गप्प करण्यासाठी सरकारने सर्व शक्ती वापरली आहे. मीडियावर निशाणा साधत प्रियांका गांधी म्हणाल्या की, देशभरातील मीडियाच्या मदतीने माझ्या भावाला 'पप्पू' घोषित करण्यात आले. पण तो माणूस जेव्हा देशाच्या प्रवासाला निघाला तेव्हा तो पप्पू नसल्याचं लोकांना दिसलं. त्या म्हणाले की, सत्य हे आहे की या देशाचे पंतप्रधान भित्रे आहेत.
'तुम्हाला देशातील जनता धडा शिकवेल' :प्रियंका पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान सत्तेच्या मागे लपले आहेत. मात्र या अहंकारी राजाला देशातील जनता धडा शिकवेल, असे त्या म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, मला मीडियाला सांगायचे आहे की, आज लोकशाही धोक्यात आहे. आज तरी तुम्ही खरे बोलण्याची हिंमत करा. जेव्हा अहंकारी हुकूमशहा उत्तर देऊ शकत नाहीत तेव्हा तो पूर्ण शक्तीने जनतेला दाबण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की हे सारे सरकार एका माणसाला वाचवण्यासाठी इतके प्रयत्न का करत आहे?
हेही वाचा :Rahul Gandhi Twitter : खासदराकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी बदलले आपले ट्विटर बायो, लिहिले...