केदारनाथ (उत्तराखंड) : उत्तराखंड (Uttarakhand) मध्ये केदारनाथच्या जवळ (Kedarnath) एक हेलीकॉप्टर कोसळले आहे. (Helicopter Crash) या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे असल्याचे सांगितले जात आहे. माहिती देताना मुख्यमंत्र्यांचे विशेष प्रधान सचिव अभिनव कुमार यांनी सांगितले की, उत्तराखंडमधील फाटा येथे हेलिकॉप्टर क्रॅश झाले असून अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
सात जणांचा दुर्दैवी मृत्यू : याबाबत माहिती अशी की, आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुद्रप्रयागच्या केदारनाथच्या ठिकाणी प्रवाशांना गुप्तकाशीला परत आणणारे आर्यन एव्हिएशनचे हेलिकॉप्टर गरुडचट्टीजवळ कोसळले. या अपघाताची माहिती मिळताच केदारनाथमध्ये नियुक्त स्थानिक पोलीस, एसडीआरएफ, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासनाचे पथक बचावकार्यासाठी तातडीने अपघातस्थळी पोहोचले. तर या अपघातात हेलिकॉप्टरच्या पायलटसह एकूण सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती : जोरदार पाऊस पडत आहे. अवघ्या 15 मिनिटांत अचानक हवामान खराब झाले. यानंतर इतर उड्डाण रद्द करण्यात आल्याचे समजते. उत्तराखंडमधील फाटा येथे हेलिकॉप्टर अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांचे विशेष प्रधान सचिव अभिनव कुमार यांनी दिली.
मृतांचा तपशील
1 श्री. अनिल सिंग - पायलट, (वय 57 वर्षे) मुंबई, महाराष्ट्राचे रहिवासी
2 श्रीमती उर्वी बरड (25 वर्षे) भावनगर, गुजरात