नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 23 जानेवारीला पश्चिम बंगाल आणि आसामच्या दौर्यावर आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदी कोलकाता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 12 व्या जयंतीनिमित्त आयोजित 'पराक्रम दिवस' समारंभाला संबोधित करतील.
या व्यतिरिक्त पंतप्रधान आसामच्या शिवसागरमधील जेरेंगा पाथरलाही भेट देतील. येथे पीएम मोदी 1.06 लाख लोकांना जमीन भाडेपट्टी प्रमाणपत्र वाटप करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौऱ्या येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजीत करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यंदा पश्चिम बंगाल आणि आसमा मध्ये निवडणूका होणार आहेत.
निवडणूक आयोगाचं पथक आसाम दौऱ्यावर -
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या नेत़ृत्वाखाली निवडणूक आयोगाचं पथक आजपासून तीन दिवसांचा आसाम दौरा करणार असून राज्य विधानसभा निवडणुका घेण्याच्या अनुषंगानं परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. हे पथक या दौऱ्यात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना तसंच अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या तारखा निश्चित करणार आहे.