महाराष्ट्र

maharashtra

Krishnam Raju Passes Away : तेलुगू अभिनेते कृष्णम राजू यांचे निधन; पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

By

Published : Sep 11, 2022, 12:06 PM IST

Updated : Sep 11, 2022, 1:51 PM IST

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते आणि माजी खासदार कृष्णम राजू यांचे ( Krishnam Raju passes away ) हैदराबाद येथे निधन झाले. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ( Prime Minister Narendra Modi saddened ) शोक व्यक्त केला आहे. येत्या पिढ्या त्यांची सिनेमॅटिक तेज आणि सर्जनशीलता लक्षात ठेवणार, ते समाजसेवेतही आघाडीवर होते आणि राजकीय नेता म्हणून त्यांनी ठसा उमटवला होता, अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Krishnam Raju Passes Away
कृष्णम राजू यांचे निधन

हैदराबाद :ज्येष्ठ तेलुगू अभिनेते आणि माजी खासदार कृष्णम राजू यांचे ( Krishnam Raju passes away ) हैदराबाद येथे निधन झाले. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ( Prime Minister Narendra Modi saddened ) शोक व्यक्त केला आहे. येत्या पिढ्या त्यांची सिनेमॅटिक तेज आणि सर्जनशीलता लक्षात ठेवणार, ते समाजसेवेतही आघाडीवर होते आणि राजकीय नेता म्हणून त्यांनी ठसा उमटवला होता, अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनीही कृष्णम राजू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कृष्णम राजू हे 'बाहुबली' स्टार प्रभासचे काका होते. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार, त्यांना कोविड ची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना ५ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी पहाटे, हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात उपचार सुरू असतांना त्यांचे निधन (Krishnam Raju passed away) झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे.

वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री :उप्पलापती कृष्णम राजू हे दोन वेळा लोकसभेचे सदस्य होते आणि त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम केले होते.

खलनायक म्हणुन प्रसिध्द : 'खलनायकाची' भूमिका साकारणारे अभिनेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजू यांनी 180 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. आणि आपल्या बंडखोर अभिनयामुळे ते सदैव प्रसिद्धी झोतात राहीले. त्यांनी 1966 मध्ये 'चिलाका गोरिंका' या तेलुगू चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. राजू यांनी चित्रपटांमध्ये साकारलेल्या विविध भूमिकांसाठी, त्यांना अनेक पुरस्कार आणि प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले.

चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कृष्णम राजू यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. राजू यांनी आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले. आपल्या अनोख्या अभिनय शैलीने 'खलनायक' म्हणून चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकणारे कृष्णम राजू यांचे निधन म्हणजे तेलुगु चित्रपट सृष्टीकरिता खूप मोठे नुकसान आहे. कृष्णम राजू यांनी लोकसभेचे सदस्य, केंद्रीय मंत्री म्हणून आणि राजकीय प्रशासनाच्या माध्यमातून देशातील जनतेची सेवा केली. त्यांचे असे जाणे, हे दुःखद आहे, असेही के. चंद्रशेखर राव म्हणाले.

कृष्णम राजू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतांना, तेलंगणा भाजपचे प्रमुख बंदी संजय कुमार यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, कृष्णम राजू यांचे निधन दुःखद आहे. त्यांच्या निधनाने भाजप, तेलुगू चित्रपट व उद्योग क्षेत्रातील लोकांचे मोठे नुकसान झाले आहे.

5 ऑगस्टला रुग्णालयात दाखल - ज्या एआयजी रुग्णालयात कृष्णम राजू यांच्यावर उपचार सुरू होते. त्या रुग्णालयाच्या प्रशासनाने एका निवेदनात म्हटले आहे की, कोविड नंतर होणाऱ्या शरीरातील त्रासांमुळे, 5 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना प्रतिरोधक जिवाणूंची अधिकची मात्रा दिल्याने, बुरशीजन्य आजार झाला होता. तसेच, गंभीर संसर्गजन्य ब्राँकायटिसमुळे होणारा न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले होते.

राजू यांच्या हृदयाने व मूत्रपिंडाने काम करणे बंद केले असल्यामुळे, त्यांना रुग्णालयात दाखल केल्यापासुन व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर योग्य उपचार सुरू होते. व सर्व डाॅक्टर त्यांच्यावर कटाक्षाने लक्ष ठेऊन होते.

मात्र गंभीर न्यूमोनिया आणि शरीरातील अवयवांच्या कार्यांच्या गुंतागुंतीमुळे (11 सप्टेंबर 2022) आज, पहाटे 3 वाजुन 16 मिनिटांनी, त्यांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला. आणि त्यामुळे कृष्णम राजू यांचे निधन झाले.(Krishnam Raju passed away)

Last Updated : Sep 11, 2022, 1:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details