नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमधील हिरोशिमाला रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहा दिवसाच्या या दौऱ्यात पापुआ न्यू गुनिया आणि ऑस्ट्रेलियाला भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहा दिवसाच्या दौऱ्यात शिखर परिषदांमध्ये सहभागी होणार आहेत. त्यासह ते द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत.
जी 20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांच्या या दौऱ्याविषयी माहिती दिली. यावेळी पंतप्रधान किशिदा यांच्या नुकत्याच झालेल्या भारत भेटीनंतर त्यांना पुन्हा भेटून आनंद होईल. या वर्षी G20 अध्यक्षपद भारताकडे असणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. जगासमोरील आव्हाने आणि त्यांना एकत्रितपणे संबोधित करण्याची गरज यावर मी G7 देश आणि इतर आमंत्रित भागीदारांसोबत विचारांची देवाणघेवाण करण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी या निवेदनात स्पष्ट केले आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या काही नेत्यांसोबत पंतप्रधान मोदी द्विपक्षीय बैठकाही घेणार असल्याचेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच जाणार 'या' देशात :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहा दिवसाच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पापुआ न्यू गिनीतील पोर्ट मोरेस्बीला जाणार आहेत. पॅसिफिक बेट राष्ट्राची ही त्यांची पहिलीच भेट असणार आहे. कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने न्यू गिनीतील पोर्ट मोरेस्बी या देशाला दिलेली ही पहिलीच भेट असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 22 मे रोजी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांच्यासमवेत संयुक्तपणे फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन (PIC) च्या तिसऱ्या शिखर परिषदेचे आयोजन करणार आहेत.