महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PM Inaugurate Statue of Equality : रामानुजाचार्य यांच्या 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी' पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

11व्या शतकातील भक्ती संत श्री रामानुजाचार्य ( Bhakti saint Sri Ramanujacharya ) यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या 216 फूट उंच 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी' पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित ( PM Inaugurate Statue of Equality ) करण्यात आला. यावेळी पंतप्रधान यांनी शमशाबाद येथील यज्ञशाळेत जाऊन यज्ञपुजा केली.

PM Inaugurate Statue of Equality
रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचे नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण

By

Published : Feb 5, 2022, 6:34 PM IST

Updated : Feb 5, 2022, 7:14 PM IST

हैदराबाद (तेलंगणा) : 11व्या शतकातील भक्ती संत श्री रामानुजाचार्य ( Bhakti saint Sri Ramanujacharya ) यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या 216 फूट उंच 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी'चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण ( PM Inaugurate Statue of Equality ) केले. यावेळी पंतप्रधान यांनी शमशाबाद येथील यज्ञशाळेत जाऊन यज्ञपुजा केली.

'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी' पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

रामानुजाचार्यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार -

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (शनिवार) हैदराबाद दौऱ्यावर ( Pm Modi In Hyderabad ) आहेत. यावेळी ते 11 व्या शतकातील संत श्री रामानुजाचार्य यांच्या 'स्टैच्यू ऑफ इक्वालिटी' च्या ( Statue of Equality ) पुतळ्याचे अनावरण केले. संत श्री रामानुजाचार्य यांचा हा पुतळा राष्ट्राला समर्पित केला. त्यानंतर पंतप्रधान मोदी आईसीआरआईएसएटीच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तेलंगणाचे मुख्य सचिव सोमोश कुमार आणि पोलीस महानिरीक्षक एम महेंद्र रेड्डी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याची माहिती घेत पाहाणी केली होती.

पंचधातूंच्या मिश्रणापासून बनवलेला पुतळा -

पंतप्रधान मोदी 216 फुट उंच असलेल्या 'स्टैच्यू ऑफ इक्वेलिटी' या पुतळ्याचे अनावरण केले. हा पुतळा 11 व्या शतकातील संत श्री रामानुजाचार्य यांचा आहे. सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त या पंचधातूंच्या मिश्रणापासून हा पुतळा बनलेला आहे. तसेच, येथे संत रामानुजाचार्य यांचे कार्यबाबतची प्राचीन ग्रंथ, थिएटर आणि एक शैक्षणिक दालन आहे.

दौऱ्यानिमित्त 8000 पोलीस कर्मचारी तैनात -

पंतप्रधान मोदी दिल्लीहून बेगमपेट येथे विमानाने आले. तेथून ते हेलिकॉप्टरने आईसीआरआईएसएटीच्या येथे पोहचले. सुवर्ण महोत्सव सोहळ्यात सहभागी झाले. तेथे आईसीआरआईएसएटीच्या नवीन लोगेचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर संत श्री रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. दरम्यान, पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या ताफ्याला रोखण्यात आल्याने पोलीस खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सुरक्षेसाठी 8000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा -Republic Day 2022 : यूपीच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, तर महाराष्ट्राला 'पॉप्युलर चॉईस कॅटेगरी पुरस्कार'

Last Updated : Feb 5, 2022, 7:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details