अजमेर :पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थान दौऱ्यावर आहेत. ते पुष्करला पोहोचले आहेत, जिथे पंतप्रधान मोदींनी ब्रह्मा मंदिरात प्रार्थना केली. त्यानंतर ते अजमेरला पोहोचले. त्यानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित करतेवेळी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस पक्ष रिमोटने चालणारा पक्ष असल्याचा घाणाघात त्यांनी केला आहे.
काँग्रेस हा 85 टक्के कमिशन मिळवणारा पक्ष : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीही मान्य केले होते की जेव्हा काँग्रेस सरकार 100 पैसे जनतेला पाठवत असे, तेव्हा त्यातील 85 पैसे भ्रष्टाचारात जायचे. प्रत्येक योजनेत 85 टक्के कमिशन मिळवणारा काँग्रेस पक्ष आहे. लूट करताना काँग्रेस भेदभाव करत नाही. काँग्रेसने देशातील प्रत्येक नागरिकाची समान लूट केली आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केला आहे.
काँग्रेस असती तर लसीकरणासाठी 40 वर्षे : काँग्रेसचे सरकार असते तर, एक पिढी गॅस कनेक्शनशिवाय राहिली असती. काँग्रेसचे सरकार असते तर, लसीकरणासाठी 40 वर्षे लागली असती. 2014 पूर्वी अशी 18 कोटींहून अधिक कुटुंबे होती जिथे नळाची जोडनी नव्हती, पाईप कनेक्शन नव्हते. गेल्या 3 वर्षात भाजप सरकारने 9 कोटी लोकांना पीण्याच्या पाण्याचे कनेक्शन दिले आहे.