मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात बैठक ( Presidential election 2022 meeting ) घेणार असून, या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) सहभागी होणार नाहीत. ही बैठक १५ जूनला होणार आहे. ममता बॅनर्जी यांनी विरोधीपक्षांच्या बैठकीचे आयोजन केले असून, अनेक महत्त्वाचे नेते बैठकीत सहभागी होणार आहेत.
शिवसेनेने याबाबत माहिती दिली आहे. या बैठकीला कोण-कोण उपस्थित राहणार याबाबत सध्या पक्षाकडून माहिती देण्यात आलेली नाही. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे निश्चित झाले आहे. शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांचा १५ जूनचा कार्यक्रम आधीच ठरलेला असल्याने ते या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.