महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नरेंद्र मोदी @71! राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह दिग्गजांकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव - उपराष्ट्रपतींच्या मोदींना शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 71 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने अनेक राजकीय नेते, कलाकार, चाहते, कार्यकर्ते मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, स्मृती इराणी आणि देवेंद्र फडणवीसांसह अनेकांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मोदींच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी भाजपकडून सेवा व समर्पण अभियान राबवले जात आहे.

hbd modi
hbd modi

By

Published : Sep 17, 2021, 9:50 AM IST

Updated : Sep 17, 2021, 9:55 AM IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंसह देशभरातील अनेक नेते व मान्यवरांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, आज मोदींवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींकडून शुभेच्छा

"भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो. 'अहर्निशं सेवामहे' या सर्वविदित भावनेसह ते कायम राष्ट्रसेवेत कार्यरत राहावेत" असे ट्विट करत राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना वाढदिवसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "पंतप्रधान नरेंद्र मोदींना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांची दूरदृष्टी, अनुकरणीय नेतृत्व आणि समर्पित सेवा यामुळे राष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला आहे. त्यांना दीर्घ, निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा" असे ट्विट व्यंकय्या नायडूंनी केले आहे.

शरद पवारांच्या शुभेच्छा

'पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी मोदींना चांगले आरोग्य आणि आनंदी जीवनासाठी शुभेच्छा देतो', असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

स्मृती इराणींच्या शुभेच्छा

'बांधिलकी आणि शुद्धतेचे मूर्त स्वरूप, देशाचे यशस्वी पंतप्रधान ज्यांनी लोकांच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमच्या नेतृत्वाखाली देश सातत्याने प्रगती करत आहे. मी तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करते. #HappyBdayModiji', असे स्मृती इराणी यांनी ट्विट केले आहे.

राजनाथ सिंहांकडून शुभेच्छा

'भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मोदी निर्णय घेण्याची क्षमता, कल्पनाशक्ती आणि दूरदृष्टीसाठी ओळखले जातात. भारताला स्वावलंबी बनवण्याचा मोदींचा संकल्प हे त्यांच्या दूरदृष्टी आणि प्रबळ इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. आपल्या आतापर्यंतच्या कार्यकाळात पंतप्रधानांनी विकास आणि सुशासनाचे अनेक नवे अध्याय लिहिले आहेत. भारताला एक सशक्त, समृद्ध आणि स्वाभिमानी देश बनवण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होवो, हिच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. देव त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो' असे ट्विट राजनाथ सिंह यांनी केले आहे.

प्रकाश जावडेकरांच्या शुभेच्छा

'नरेंद्र मोदींच्या रूपाने भारत आणि जगाला एक अद्भुत नेता लाभला आहे. त्यांनी देशाला भष्टाचारमुक्त व पारदर्शी सरकार दिलं. आपल्या निर्णायक व दूरदर्शी नेतृत्वाने भारताला जागतिक स्तरावर विकास व प्रगतीचे प्रतीक बनवणारे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!', असे ट्विट प्रकाश जावडेकरांनी केले आहे.

देवेंद्रांच्या नरेंद्रांना शुभेच्छा

'युवकांचे नेते, गरिबांचे नेते, निर्विवाद, निश्चयी, निर्णायक नेते... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyBdayModiji', असे ट्विट महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

अमोल कोल्हेंच्या शुभेच्छा

'देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई जगदंबा आपणांस निरोगी व उदंड आयुष्य देवो ही सदिच्छा!',असे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. तसे ट्विट त्यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त भाजप पार्टी तर्फे आजपासून 7 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशात #सेवा_व_समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे.

कार्यकर्त्यांनी कापले 71 किलोचे लाडू

नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मोदींच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांनी गुरुवारी (17 सप्टेंबर) मातीचे दिवे पेटवले. तसेच, 71 किलो वजनाचे लाडू कापले.

काशी संकल्पाचे लोकार्पण

भाजप खासदार रूपा गांगुली आणि बनारस हिंदु युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू जीसी त्रिपाठी यांच्या उपस्थितीत 'काशी संकल्प' नावाच्या पुस्तकाचे लोकार्पणही करण्यात आले.

मध्य प्रदेशच्या भोपाळमधील लालघाटी चौराहा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला भाजप कार्यकर्त्यांनी 71 फूट लांबीच्या लस्सीच्या आकाराचा केक कापला.

हेही वाचा -ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी : मोदींकडून दगडूशेठ ट्रस्टच्या व्हर्च्युअल माध्यम सुविधेचे कौतुक

Last Updated : Sep 17, 2021, 9:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details