महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Pregnant Lady demands euthanasia: अश्लील व्हिडिओमुळे गर्भवती महिला त्रस्त, जीवन संपवण्याची केली मागणी - जीवन संपवण्याची केली मागणी

सोशल मीडियामुळे गर्भवती महिला इतकी असहाय्य झाली आहे की, तिने आपले जीवन संपवण्याची परवानगी मागितली आहे (Pregnant Lady Troubled in Bharatpur). महिलेच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावरील क्लिपच्या आधारे तिला ब्लॅकमेल केले जात आहे. तिने शेवटी एसपी कार्यालयात येऊन आपली कहाणी सांगितली (Pregnant Lady demands euthanasia).

भरतपूरमध्ये अश्लील व्हिडिओमुळे गर्भवती महिला त्रस्त
भरतपूरमध्ये अश्लील व्हिडिओमुळे गर्भवती महिला त्रस्त

By

Published : Jul 26, 2022, 12:28 PM IST

भरतपूर - सोशल मीडियावर गेल्या 5 महिन्यांपासून एक अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे (Pregnant Lady Troubled in Bharatpur). कामण परिसरातील एका गावातील काही तरुण त्या अश्लील व्हिडिओच्या आधारे गर्भवती महिलेचा छळ करत आहेत. तरुणांच्या टोमण्यांमुळे त्रस्त झालेल्या महिलेने सोमवारी एसपी कार्यालय गाठून घटनेची माहिती दिली. तसेच इच्छामरणाची परवानगी मागणारे निवेदन दिले (Pregnant Lady demands euthanasia). हे प्रकरण गांभीर्याने घेत एसपींनी अधिकारी कमान यांना तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकांनी केले त्रस्त - कमन भागातील 35 वर्षीय गर्भवती सोमवारी एसपी कार्यालयात पोहोचली. सुमारे 5 महिन्यांपासून एक पॉर्न व्हिडिओ व्हायरल होत असल्याचा आरोप गर्भवतीने केला आहे. व्हिडिओ पाहून गावातील तरुण तिला टोमणे मारायचे. मात्र कोणता व्हिडीओ पाहून लोक तिचा छळ करत आहेत याची तिलाही माहिती नव्हती. लोकांनी जास्त त्रास दिल्यावर महिलेने तिच्या पतीला व्हिडिओबद्दल माहिती घेण्यास सांगितले.

पोलिसांनी कारवाई केली नाही - व्हिडीओबाबत माहिती घेतली असता तो दुसऱ्या महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर 21 जुलै रोजी गरोदर महिला पतीसह कामण पोलीस ठाण्यात पोहोचली. पोलीस ठाण्यात महिलेने छळ करणाऱ्या मोहन सिंग, अमर सिंग, राजवीर, दीपचंद, जमन, सीमा आणि इतर अनेकांविरोधात तक्रार केली. कामण पोलिसांनी महिलेची ही तक्रार मात्र ऐकून घेतली नाही.

इच्छामरणाची मागणी - गावातील लोकांचे टोमणे आणि पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने त्रासलेल्या पीडित महिलेने 22 जुलै रोजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मुख्यालय चंद्र प्रकाश शर्मा यांच्याकडे तक्रार केली. परंतु त्यांनीही ऐकले नाही. अखेर सोमवारी महिलेने एसपी श्याम सिंह यांच्याकडे पोहोचून व्यथा सांगितली. कारवाई न झाल्यास इच्छामरणाची परवानगीही तिने मागितली. संपूर्ण समस्या ऐकून घेतल्यानंतर पोलिस अधीक्षक श्याम सिंह यांनी कामण स्टेशन प्रभारींना या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा - COURT EXTENDS CHATTERJEES CUSTODY : पार्थ चॅटर्जींच्या ईडी कोठडीत वाढ, 3 ऑगस्टपर्यंत कोठडीत मुक्काम

ABOUT THE AUTHOR

...view details