नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखेच्या घोषणेनंतर दुसर्याच दिवशी भाजपाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करत एक पोस्टर जारी केले. भाजपाने पक्षातील नऊ महिला नेत्यांची छायाचित्रे असलेले एक पोस्टर जारी केले आहे. बंगालला आपली आत्या नाही, तर मुलगी हवी आहे, असे त्यावर लिहलेले आहे.
तृणमूल काँग्रेसने भाजपावर टीका करत 'बंगाल को अपनी बेटी चाहिए', अशी घोषणा दिली होती. त्यावर भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपनं बंगाल भाजपमधील नऊ महिला नेत्यांचे फोटो ट्वीटरवरुन शेअर केले आहेत. गालला आपली मुलगी हवी आहे, आत्या नाही, अशा शब्दात त्यांन दीदींवर टीका केली. भाजपनं पोस्टरमध्ये ममता यांना आत्या म्हटलं आहे.
दीदींवरील आरोप -
भाजपा सुरुवातीपासूनच ममता बॅनर्जींवर 'दीदी-भतीजा’ मुद्द्यावरून लक्ष्य करत आली आहे. अमित शाह यांच्यासह भाजप नेते बॅनर्जींवर सातत्याने वंशवादाच्या राजकारणाचा आरोप करतात. मोदी सरकार "लोककल्याणासाठी" काम करते. तर ममता बॅनर्जी जनतेच्या कल्याणाऐवजी फक्त स्वत:च्या भाच्याच्या कल्याणासाठी काम करतात, असे शाह एका सभेत म्हणाले होते. ममता टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या आत्या आहेत.
भाजपाच्या पोस्टरवर तृणमूलची प्रतिक्रिया -