कोलकाता - लोकप्रिय गायक केके यांचे मंगळवार (31 मे)रोजी वयाच्या ५३ व्या वर्षी स्टेज शो करत असताना निधन झाले. कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमात ते गात होते. ( Singer KK passes away ) हा कार्यक्रम चालू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे ते कोसळले. त्यांला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, तेथे त्यांना मृत घोषीत करण्यात आले. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.
आरडी बर्मन यांचा प्रभाव - गायक केके यांचे पूर्ण नाव कृष्णकुमार कुननाथ होते. पण ते गायक केके म्हणून जास्त प्रसिद्ध होते. ते दिल्लीचे रहिवासी होते. तेथील किरोरी माल महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच प्रसिद्ध गायक किशोर कुमार आणि संगीतकार आरडी बर्मन यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. ( Popular singer KK dies in Kolkata ) प्रथमच द्वितीय वर्गात शिकत असताना त्यांनी स्टेपवर गाण्याचा परफॉर्मन्स दिला. त्यानंतर हळूहळू गाण्याचा छंद इतका वाढला की त्यालाच त्यांनी करिअर बनवले.
1994 मध्ये त्यांनी मुंबईत आले - विशेष म्हणजे गायक होण्याआधी त्यांनी जवळपास 8 महिने सेल्समन म्हणून काम केले होते. मात्र, त्यांना ते काम करावेसे वाटले नाही आणि त्यांचे खरे प्रेम गाणे हेच आहे हे त्यांच्या लक्षात आले. 1994 मध्ये त्यांनी मुंबई गाठली आणि त्यानंतर गायिका शिबानी कश्यपसोबत जिंगल्स गाण्यास सुरुवात केली. ( singer KK's song ) त्यांच्या पत्नी व कुटुंबीयांनीही या कामात पूर्ण सहकार्य केले. त्यांनी केवळ हिंदीच नाही तर गुजराती, तेलुगू, तामिळ, कन्नड, मराठी, बंगाली आणि मल्याळम गाण्यांनाही आपला आवाज दिला.