नवी दिल्ली - अंतराळ क्षेत्राचा पाया हा काँग्रेसच्या काळात घातला असल्यानं याचं श्रेय काँग्रेसला जात असल्याचा दावा काँघ्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलाय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सध्या नवीन क्रांती घडवली असल्यानं ही ऐतिहासिक कामगिरी 'इस्रो'नं केली. त्यामुळं याचं श्रेय भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही जात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आलाय. तर चंद्रयानच्या यशाचं श्रेय हे इस्रोच्या वैज्ञानिकांचं असल्याचं मत इतर राजकीय पक्षांनी व्यक्त केलंय. त्यामुळे 'चंद्रयान' जरी चंद्रावर सुखरुप पोहचलं असलं तरी इकडं देशात मात्र श्रेयवादाची लढाई सुरू झालीयं. (Politics on Chandrayaan 3) (Chandrayaan 3 Mission) (Mahua Moitra on Adani Chandrayaan Mission) (Adani Flats on Moon)
'टीएमसी'चा मोदी सरकारवर हल्ला - 'चंद्रयान -3' हे चंद्रावर दाखल झालं. त्यामुळं आता चंद्रावर फ्लॅट बांधण्याचं काम अदानीकडं सोपवलं जाईल आणि त्यात मुस्लिमांना प्रवेश नसेल, असा खोचक टोला 'टीएमसी'चे खासदार महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारला लगावलाय.
श्रेयवादाची लढाई सुरू - एकीकडं 'चंद्रयान-३' मोहिमेच्या यशाबद्दल संपूर्ण देश उत्साहात असताना दुसरीकडं राजकारण मात्र काही कमी होत नाहीये. काँग्रेस पक्षानं त्यांच्या काळात केलेल्या कामाचं श्रेय स्वत:ला देण्याचा प्रयत्न केलाय. तर इतर विरोधी पक्षांनी या यशाचं श्रेय वैज्ञानिकांना दिलंय. याचं श्रेय वैज्ञानिकांसोबतच मोदी सरकारलाही गेलं पाहिजे, असं भाजपाचं मत आहे. त्यामुळे देशात श्रेयवादाची लढाई जोरात सुरुये. त्यामुळे मुख्य राजकीय पक्षांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू असल्याचं दिसून येतंय.