सुरत:शिवसेना नेते एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या ३४ सोबतच ७ अपक्ष अशा एकुण ४१ आमदारांसह, गुवाहाटी, आसामला जाण्यासाठी सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. ते जे सुरतमधील ले मेरिडियन हॉटेलमध्ये थांबले होते. दिवसभराच्या नाट्यमय घडामोडी नंंतर काय होणार तोडगा निघणार का असे प्रश्न निर्माण झाले होते. रात्री या आमदारांना सुरत येथुन नेमके कोठे पाठवले जाणार, या बद्दल साशंकता होती. पण रात्री उशीरा त्यांना गुवाहाटी आसाम येथे पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच रात्री उशीरा सुरतमधील ले मेरिडियन हॉटेलमधुन गुवाहाटी, आसामला जाण्यासाठी सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. सुरत ते गुवाहाटी हे हवाई अंतर साधारण ३ ते ३.३० तासांचे आहे.
Political Crises In Maharashtra : एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार गुवाहाटीत पोहोचले - गुवाहाटी आसाम
शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena leader Eknath Shinde), पक्षाचे ३४ आमदार आणि ७ अपक्ष आमदारांसह, जे सुरतमधील ले मेरिडियन हॉटेलमध्ये (Meridian Hotel) थांबले होते, ते गुवाहाटी, आसामला (Guwahati Assam) जाण्यासाठी (Rebel MLA leaves for Guwahati) सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले.
बंडखोर आमदार गुवाहाटी कडे रवाना
Last Updated : Jun 22, 2022, 6:45 AM IST