गोवा - गोव्यामध्ये नेहमी राजकीय स्थिती अस्थिर राहिलेली आहे. गोव्यात आज विधानसभेच्या 40 जागांसाठी मतदान झाले तब्बल 301 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. या निवडणुकीत 22 जागांपेक्षा जास्त जागा भाजपा मिळवेल असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत व्यक्त करतात. मात्र गोव्यातील राजकीय विश्लेषकांचे मत याहून वेगळे आहे. काँग्रेस सध्या गलितगात्र अवस्थेत असली तरी मागच्या एवढ्याच 17 पेक्षा जागा काँग्रेस मिळवेल, तर भाजपा 14 जागा न पर्यंत जाऊन अन्य पक्षातील आमदारांना गळाला लावून गोव्यात सरकार स्थापन करेल. असा विश्वास राजकीय विश्लेषकांना वाटतो. गोव्यातील ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ, अनिल लाड आणि स्नेहल जोशी या तिघांना देखील गोव्यात पुन्हा एकदा स्थिर सरकार येणार नाही असे वाटत आहे.
'याचा फटका भाजपला बसू शकतो'
भाजपा अंतर्गत या निवडणुकीत बंडाळी मोठी आहे. पणजी विधानसभा मतदारसंघातून मनोहर परिकर यांचे चिरंजीव उत्पल परिकर हे अपक्ष लढत आहेत. तर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीदेखील बंडखोरी केली आहे. याचा फटका भाजपला बसू शकतो का यावर देखील या राजकीय विश्लेषकांनी आपले मत व्यक्त केले आहे.