अमृतसर : एसएसपी गुलनीत सिंग खुराना म्हणाले की, पंजाब पोलिसांचे पथक या घटनेचा तपास करत आहे. तपासादरम्यान, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार गनर देसाई मोहन याचा तपासात समावेश करून त्याची गंभीर चौकशी केली असता, आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. जिल्ह्यातील लष्करी ठाण्याच्या आत गोळीबार प्रकरणी पोलिसांनी मोठ्या कारवाईत एका जवानाला अटक केली आहे. वैयक्तिक कारणास्तव त्याने आधी चार जवानांना मारण्यासाठी रायफल चोरली, नंतर त्याच रायफलने चौघांची गोळ्या झाडून हत्या केली.
काय आहे प्रकरण :भटिंडाच्या मिलिट्री स्टेशनमध्ये पहाटे 4.35 वाजता झालेल्या गोळीबारात तोफखाना युनिटशी संबंधित 4 जवानांचा मृत्यू झाला. ड्रायव्हर एमटी संतोष, ड्रायव्हर एमटी कमलेश, ड्रायव्हर एमटी सागरबान आणि गनर योगेश कुमार अशी या जवानांची नावे आहेत. या प्रकरणी मेजर आशुतोष शुक्ला यांच्या जबानीवरून भटिंडा पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मेजर आशुतोष यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोर पांढरा कुर्ता आणि पायजामा घालून आले होते, एकाकडे रायफल आणि दुसऱ्याकडे कुऱ्हाड होती. शवविच्छेदनानंतर मृत जवानांना कडक सुरक्षेत परत कॅन्टोन्मेंट झोनमध्ये आणण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आज एका जवानाला अटक केली आहे.