नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर आहेत. तब्बल आठ महिन्यानंतर ते वाराणसी दौऱ्यावर आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान मोदींनी वाराणसीचा दौरा केला होते. या दौऱ्यात ते 15 हजार कोटी रुपयांच्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते गुजरात सायन्स सिटी मधल्या अॅक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरीचे, "रुद्राक्ष" आंतराराष्ट्रीय सहयोग संमेलन केंद्राचे आणि नेचर पार्कचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण सध्या गरम असून मोदींच्या दौऱयाने घडामोडींचा वेग वाढला आहे. राज्यात पुढील वर्षात विधानसभा निवडणुका होणार असल्याने मोदींचा हा दौरा महत्त्वपूर्ण आहे.
गांधीनगर राजधानी रेल्वे स्थानकाचा 71 कोटी रुपये खर्चून पुनर्विकास करण्यात आला असून मोदींच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. या स्थनाकात दिव्यांगांसाठी विशेष तिकीट आरक्षण खिडकी, रॅम्प, उद्वाहने, समर्पित पार्किंग सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. तसेच आणखी गांधीनगर राजधानी- वाराणसी अतिजलद गाडी आणि गांधीनगर राजधानी ते वरेथा दरम्यानच्या मेमू सेवा गाडीला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील.
अॅक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरी
अॅक्वेटिक्स गॅलरीमध्ये महत्वाचे शार्क मासे राहणार आहेत. अद्भुत अनुभव देणारा 28 मीटरचा बोगदाही इथे आहे. तर रोबोटिक्स गॅलरी ही रोबोटिक्स तंत्रज्ञानाचे दर्शन घडवणारी आहे. मानवासारखा रोबो या रोबोटिक्स गॅलरीत पाहायला मिळणार आहे. औषध, कृषी, अंतराळ, संरक्षण क्षेत्रासह आणि दैनंदिन जीवनात उपयोगी ठरणारे रोबो गॅलरीत आहेत.
नेचर पार्क -