नवी दिल्ली -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानीतील नव्या संसद भवनाचे भूमिपूजन केले. या सोहळ्याला गृहमंत्री अमित शाह, उद्योगपती रतन टाटा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. चार मजली संसद भवनाची इमारतीचा 64 हजार 500 चौरस फूट परिसरात विस्तार असणार आहे. टाटा कंपनीला हे कंत्राट देण्यात आले असून याची अंदाजे किंमत 971 कोटी आहे. सध्या संसदेत 888 सदस्यांना बसण्याची आसनक्षमता आहे. ती वाढून 1 हजार 224 होणार आहे. आमुळे लोकसभा आणि राज्यसभेचे एकत्रित कामकाज बघण्यासाठी देखील फायद्याचे ठरणार आहे. याच प्रमाणे राज्यसभेची आसन क्षमता देखील 384 होणार आहे.
भारताचा गौरवशाली वारसा या नवीन संसद भवनात जतन केला जाईल. नवीन संसदेची इमारत 'आत्मनिभार भारत' या दृष्टीकोनाचा एक अविभाज्य भाग असेल. कारण देशभरातील कारागीर आणि शिल्पकार नव्या इमारतीत भारताची सांस्कृतिक विविधता दर्शवण्यास आणि त्यांचे प्रदर्शन करण्यासाठी योगदान देतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.