महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Narendra Modi To Visit Pushkar : पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थान दौऱ्यावर; ब्रह्मदेवाच्या पूजेनंतर करणार महाजनसंपर्क अभियानाला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुष्कर येथे ब्रह्मदेवाची पूजा करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अजमेरला नागरिकांना संबोधित करणार आहेत.

Narendra Modi To Visit Pushkar
पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : May 31, 2023, 11:05 AM IST

जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानमध्ये भाजपच्या महाजनसंपर्क अभियानाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज साडेतीन तास पुष्कर येथे राहणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रथम पुष्करमध्ये ब्रह्मदेवाची पूजा करतील त्यानंतर अजमेरमध्ये नागरिकांना संबोधित करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या महाजनसंपर्क अभियानाचे उद्घाटनही करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान दौऱ्यावर असल्याने ते नागरिकांना काय संबोधित करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दोन लाखापेक्षा जास्त नागरिकांची राहणार उपस्थिती :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजमेरमधील सभेची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या जाहीर सभेत दोन लाखांहून अधिक नागरिक सहभागी होणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुपारी 3 वाजता विशेष विमानाने किशनगडला पोहोचणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुष्करच्या ब्रह्मा मंदिरात पूजा करणार आहेत. सायंकाळी 5:00 वाजता सभेच्या ठिकाणी पोहोचून जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 6:30 वाजता किशनगड विमानतळावरून विशेष विमानाने दिल्लीला प्रयाण करणार आहेत.

असा असेल पंतप्रधानांचा राजस्थान दौरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुपारी 2 वाजता दिल्लीहून विशेष विमानाने रवाना होतील. दुपारी 3 वाजता ते किशनगड विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते लष्कराच्या हेलिकॉप्टरने पुष्करला जातील. दुपारी 3.15 वाजता पुष्कर ब्रह्मा मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रार्थना करणार आहेत. ते ब्रह्मा मंदिरात सुमारे एक ते दीड ते दीड तास मुक्काम करणार आहेत. त्यानंतर 4:45 वाजता हेलिकॉप्टरने पुष्करहून निघून पंतप्रधाने नरेंद्र मोदी हे 5 वाजता अजमेर विश्राम स्थळावर पोहोचून ते जाहीर सभेला संबोधित करतील. यादरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या महाजनसंपर्क अभियानाचे उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यक्रमस्थळी सुमारे 1 तास थांबणार आहेत. त्यानंतर ते संध्याकाळी 6.00 वाजता कार्यक्रमस्थळावरून निघून किशनगड विमानतळावर पोहोचतील आणि संध्याकाळी 6.30 वाजता विशेष विमानाने दिल्लीला परतणार आहेत. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौऱ्याचा कार्यक्रम अधिकृतपणे प्रसिद्ध झालेला नाही.

या जागांवर होणार परिणाम :पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेला गर्दी जमवण्याची जबाबदारी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना देण्यात आली आहे. दुर्गम जिल्ह्यांमधून 15 हजार आणि जवळपासच्या जिल्ह्यांमधून 20 ते 25 हजार नागरिकांना आणण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐकण्यासाठी दोन लाखांहून अधिक नागरिक पोहोचतील असा दावा भाजपकडून केला जात आहे. अजमेर, टोंक, भिलवाडा, राजसमंद, सवाई माधोपूर, नागौरसह सीमावर्ती भागातील 8 लोकसभा जागांसह जयपूरमधून अधिकाधिक लोकांना एकत्र आणण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून येईल. पंतप्रधानांच्या या सभेचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 40 विधानसभा जागांवर परिणाम होणार असल्याची माहिती राजकीय तज्ज्ञांनी दिली आहे.

महाजनसंपर्क अभियानाची सुरुवात : केंद्रातील मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. या वर्षांत मोदी सरकारचे यश घराघरात पोहोचावे यासाठी भाजपकडून महाजनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. हे महाअभियान जवळपास महिनाभर चालणार आहे. या महामोहिमेत भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक घराघरात पोहोचून मोदी सरकारच्या यशाची माहिती जनतेला देतील. त्यासोबतच ते सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांना जोडण्याचे कामही करतील. या महाजनसंपर्क अभियानात पंतप्रधान नरेंद्र मोदींची जनधन योजना, राम मंदिर निर्माण, कलम 370, स्वच्छता अभियान, उज्ज्वला गॅस आणि सर्व योजना एका पत्रकाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवल्या जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज आपल्या सभेत या महाजनसंपर्क अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. यानंतर आता भाजप संपूर्णपणे विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरणार असल्याचे मानले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details