नवी दिल्ली :जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांचा दौरा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीतील पालम विमानतळावर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. जे पी नड्डा यांच्यासोबत परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, दिल्लीचे खासदार रमेश विधुरी, माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, हंसराज हंस आणि दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधुरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जंगी स्वागत केले.
भारतावर प्रेम करणारे नागरिक :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांचे पालम विमानतळावर जंगी स्वागत केल्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. भारत काय विचार करत आहे, याची जगाला उत्सुकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मी जिथे जातो तिथे मला अभिमान वाटतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मी जेव्हा माझ्या देशाच्या संस्कृतीबद्दल बोलतो तेव्हा जगाच्या डोळ्यात पाहतो. तुम्ही देशात पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केल्यामुळे हा आत्मविश्वास आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जे लोक इथे आले आहेत ते पंतप्रधान मोदी नव्हे तर भारतावर प्रेम करणारे लोक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
संपूर्ण देशाला अभिमान वाटला :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी नागरिक येथे आले आहेत. त्यांचा आम्हाला आणि संपूर्ण देशाला अभिमान वाटल्याचे यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. हातात फलक आणि राष्ट्रध्वज घेऊन भाजप कार्यकर्ते पंतप्रधानांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते. पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी कडेकोट बंदोबस्तात नागरिक ढोल-ताशांच्या तालावर नृत्यातही तल्लिन झाल्याचे दिसून आले.
जागतिक कल्याणाच्या हितासाठी काम करणार :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी त्यांच्या सिडनी भेटीदरम्यान दिलेल्या आदरातिथ्याबद्दल त्यांचे आभार मानले. यामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील संबंधांना बळ मिळेल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. दोन्ही नेते भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैत्री आणखी वाढवण्यासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जागतिक कल्याणाच्या हितासाठी आम्ही काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायालाही संबोधित केले. यासोबतच त्यांनी अनेक व्यावसायिक नेते आणि प्रख्यात ऑस्ट्रेलियन लोकांचीही भेट घेतली.
हेही वाचा -
- Sengol : नव्या संसदेत बसवण्यात येणारा 'सेंगोल' म्हणजे आहे तरी काय? जाणून घ्या
- Adhir Ranjan Chowdhury : अधीर रंजन चौधरींचे मोदींबाबत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, 'नरेंद्र मोदी..'
- Kerala Crime News : धक्कादायक! केरळमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू