नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या (DU) शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी दाखल झाले आहेत. यावेळी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रा योगेश सिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विद्यापीठ हे शैक्षणिक चळवळ असल्याचे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 100 वर्षांच्या वाटचालीवर उभारलेल्या प्रदर्शनालाही भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्ली विद्यापीठात सुमारे दीड तास मुक्काम करणार आहेत.
दिल्ली विद्यापीठाच्या 100 वर्षाच्या वाटचालीवर पुस्तक :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्ली विद्यापीठातील शताब्दी समारंभाच्या कार्यक्रमात पोहोचले आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी वर्षावर आधारित पुस्तिकेचे प्रकाशन केले. यासोबतच दिल्ली विद्यापीठ लोगो आणि दिल्ली विद्यापीठाच्या 100 वर्षांच्या वाटचालीवर आधारित पुस्तकाचेही प्रकाशन यावेळी करण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी दिल्ली विद्यापीठामध्ये पोहोचून त्यांनी पंतप्रधानांचे स्वात केले आहे. याशिवाय UPSC-2022 टॉपर इशिता किशोर, द्वितीय क्रमांक धारक गरिमा लोहिया आणि दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा देखील दिल्ली विद्यापीठामध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे एसपीजीने एक दिवस आधीच दिल्ली विद्यापीठामध्ये तळ ठोकला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली विद्यापीठात येत असल्याने तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.