महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदी हे अहंकारी राजा - प्रियांका गांधी - प्रियांका गांधी लेटेस्ट न्यूज

प्रियांका गांधी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात किसान महापंचायतीला संबोधित केले. यावेळी त्या बोलत होत्या.

प्रियांका गांधी
प्रियांका गांधी

By

Published : Feb 20, 2021, 8:42 PM IST

मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) - काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात किसान महापंचायतीला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. एखादा सामान्य व्यक्ती राजा झाल्यावर त्याला अंहकार येतो आणि त्या गर्विष्ठ होतो, असे जुन्या कथांमध्ये सांगितले जात. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी दोनदा पंतप्रधान झाल्याने ते अंहकारी झाले आहेत. ते एक हे अहंकारी राजा आहेत, असे त्या म्हणाल्या.

केंद्र सरकारने शेतकर्‍यांचा सन्मान केला पाहिजे. त्यांना पंतप्रधानपदी बसवलेल्या शेतकऱयांशी ते चर्चा का करत नाहीत. मोदींनी त्यांचे प्रश्न सोडवायला हवेत, असे त्या म्हणाल्या. उसाची थकबाकीवरूनही त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

उसाची थकबाकी देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. मात्र, त्यांनी ते पूर्ण केले नाही. कोटी खर्च करून नवीन संसद भवन बांधण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. पण शेतकऱ्यांना उसाचा थकीत हप्ता दिला नाही. शेतकरी त्रस्त आहेत. श्रीमंत अब्जाधीशांनी हजारो कोटींची कमाई केली असून त्रासलेले शेतकरी आंदोलन करत आहेत, असे त्या म्हणाल्या

भांडवलशाही मित्रांच्या हितासाठी काम -

गेल्या सोमवारी प्रियांका गांधींनी चांदपूर येथे किसान पंचायतीला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: साठी दोन विमान खरेदी करण्यासाठी 16 हजार कोटी खर्च केले. ते इतर देशांचे दौरे करू शकतात. मात्र, शेतकऱ्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका त्यांनी केली होती. तसेच पंतप्रधान आपल्या भांडवलशाही मित्रांच्या हितासाठी काम करत आहेत. नव्या कृषी कायद्यांमुळे भांडवलदार त्यांचे भांडार भरू शकतील. पण शेतकऱयांना किमान आधारभूत किंमतही मिळणार नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details