केदारनाथ - केदारनाथला जेव्हाही येतो तेव्हा येथील कणाकणात मिसळून जातो. येथील हिमालय आणि बाबा केदारनाथ मला खेचून आणतात. काल सैन्यासोबत दिवाळी साजरी करायला मिळाली आणि आज गोवर्धन पूजेच्या दिवशी केदारनाथांचं दर्शन करण्याचा योग आला. एका दिव्य अनुभूतीचा अनुभव आला. शंकरांच्या डोळ्यांतून तेज प्रवाहित होत आहे. जे भव्य भारताचा विश्वास व्यक्त करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ येथे म्हणाले. 'जय बाबा केदार'च्या उद्गाराने पंतप्रधान मोदींनी भाषणाची सुरुवात केली.
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, आपला देश किती विशाल आहे, इतकी मोठी ऋषी परंपरा आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात एकापेक्षा एक तपस्वी आध्यात्मिक चेतना जागृत करत आहेत.आज तुम्ही श्री आदि शंकराचार्यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचे साक्षीदार आहात. भारताच्या अध्यात्मिक समृद्धी आणि रुंदीचे हे एक अतिशय अथांग दृश्य आहे. अनेक वर्षांपूर्वी केदारनाथ धाममध्ये एक दुर्घटना घडली होती. मी स्वतःच्या डोळ्यांनी विध्वंस पाहिला. लोकांना वाटायचं की आपलं केदारनाथ धाम पुन्हा उगवेल? पण माझा आतला आवाज सांगत होता की केदारनाथ धाम पूर्वीपेक्षा अधिक अभिमानाने आणि गौरवाने उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.