हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हैदराबाद दौऱ्यावर ( Pm Modi In Hyderabad ) आहेत. यावेळी ते 11 व्या शतकातील संत श्री रामानुजाचार्य यांच्या 'स्टैच्यू ऑफ इक्वालिटी' च्या ( Statue of Equality ) पुतळ्याचे ते अनावरण करणार आहेत. संत श्री रामानुजाचार्य ( Bhakti saint Sri Ramanujacharya ) यांचा हा पुतळा राष्ट्राला समर्पित केला जाणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी आईसीआरआईएसएटीच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात सहभागी होतील. तेलंगणाचे मुख्य सचिव सोमोश कुमार आणि पोलीस महानिरीक्षक एम महेंद्र रेड्डी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याची माहिती घेत पहाणी केली.
पंतप्रधान कार्यलयाने सांगितल्यानुसार, पंतप्रधान मोदी 216 फुट उंच असलेल्या 'स्टैच्यू ऑफ इक्वेलिटी' या पुतळ्याचे अनावरण करतील. हा पुतळा 11 व्या शतकातील संत श्री रामानुजाचार्य यांचा आहे. सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त या पंचधातूंच्या मिश्रणापासून हा पुतळा बनलेला आहे. तसेच, येथे संत रामानुजाचार्य यांचे कार्यबाबतची प्राचीन ग्रंथ, थिएटर आणि एक शैक्षणिक दालन आहे.