महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PM Modi in Punjab : पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर ; विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार

पंजाबमधील फिरोजपूर येथे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi's Punjab visit ) यांची राजकीय सभा होणार असून ही सभा नियोजित वेळेनुसारच होणार आहे. कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा आहे.

pm modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Jan 5, 2022, 11:06 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाब दौऱ्यावर ( PM Modi's Punjab visit ) आहेत. कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणूक 2022 लक्षात घेता हा दौरा महत्त्वपूर्ण आहे. पीएम मोदी आज फिरोजपूरला भेट देणार असून ते विकास प्रकल्पांची पायाभरणी ( PM will lay foundation stone of multiple development projects ) करणार आहेत. आगामी पंजाब विधानसभा निवडणुका पाहता हा दौरा म्हणजे पीएम मोदींच्या मिशन पंजाबची ( punjab assembly election 2022 ) सुरुवात आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

पंजाबमधील फिरोजपूरमध्ये दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवेची पायाभरणी पीएम मोदी करणार आहेत. हे प्रमुख शीख धार्मिक स्थळांना चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. याशिवाय वैष्णोदेवीपर्यंत पोहोचणेही सोपे होईल. फिरोजपूरच्या भेटीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 42,750 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती मार्ग, अमृतसर-उना विभागाचे चौपदरीकरण, मुकेरियन-तलवाडा नवीन प्रमुख रेल्वे मार्ग, फिरोजपूर येथील पीजीआय उपग्रह केंद्र आणि कपूरथला आणि होशियारपूर येथे दोन नवीन वैद्यकीय महाविद्यालये यांचा समावेश आहे.

मुकेरियन ते तलवाडा दरम्यान 410 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या सुमारे 27 किमी लांबीच्या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे भूमिपूजनही पंतप्रधान करणार आहेत. हा रेल्वे मार्ग नांगल धरण-दौलतपूर चौक रेल्वे विभागाचा विस्तार असेल. हे या भागात वाहतुकीचे सर्व-हवामान मोड प्रदान करेल. या प्रकल्पाचे धोरणात्मक महत्त्व देखील आहे. कारण, तो मुकेरियन येथील विद्यमान जालंधर-जम्मू रेल्वेमार्गाला जोडून जम्मू आणि काश्मीरसाठी पर्यायी मार्ग म्हणून काम करेल. पंजाबमधील होशियारपूर आणि हिमाचल प्रदेशातील उना येथील लोकांसाठी हा प्रकल्प विशेषतः फायदेशीर ठरेल. यामुळे या भागातील पर्यटनाला चालना मिळेल आणि हिल स्टेशन्स तसेच धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणांना सुलभ कनेक्टिव्हिटी मिळेल.

याशिवाय, पीएम मोदी फिरोजपूर येथे सुमारे 490 कोटी रुपये खर्चाच्या 100 बेडच्या PGI उपग्रह केंद्राची पायाभरणी करतील. त्याच वेळी, कपूरथळा आणि होशियारपूरमध्ये सुमारे 325 कोटी रुपये खर्चून दोन वैद्यकीय महाविद्यालये विकसित केली जातील, ज्यात 100 जागा असतील.

हेही वाचा -South Kashmir Encounter : लष्कराची मोहीम फत्ते! तीन दशतवाद्यांचा खात्मा

ABOUT THE AUTHOR

...view details