महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PM Modi Mother Birthday : पंतप्रधानांच्या आई 18 जूनला होतील 100 वर्षांच्या.. आशीर्वाद घेण्यासाठी गुजरातला जाणार मोदी - पंतप्रधान मोदींच्या आई होणार १०० वर्षांच्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून रोजी गुजरात दौऱ्यावर ( PM Narendra Modi Gujrat ) आहेत. यादरम्यान ते अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. पण त्यांची भेट विशेषत: चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे ते त्यांच्या आईला भेटणार ( PM Modi Will Meet His Mother ) आहेत. त्यांची आई हिराबा यंदा शंभर वर्षांची होणार ( hiraba turns 100 on june 18 ) आहे. 18 जून रोजी त्यांचा वाढदिवस आहे.

PM Modi Mother Hiraba
पंतप्रधान मोदी आई हिराबा

By

Published : Jun 16, 2022, 1:47 PM IST

गांधीनगर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच झालेला गुजरात दौरा ( PM Narendra Modi Gujrat ) अतिशय संस्मरणीय होता. पंतप्रधान 18 जूनला पुन्हा एकदा गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ही भेट पंतप्रधानांसाठी खास असेल, कारण त्यांची आई हिराबा 18 जून रोजी 100 वर्षांची होणार ( hiraba turns 100 on june 18 ) आहे. 18 जून रोजी त्यांचा वाढदिवस आहे. पंतप्रधान जेव्हाही गुजरातमध्ये येतात तेव्हा ते त्यांच्या आईला भेटण्याचा प्रयत्न ( PM Modi Will Meet His Mother ) करतात.

पंतप्रधानांचे धाकटे बंधू पंकज मोदी म्हणाले, 'हिराबाचा जन्म १८ जून १९२३ रोजी झाला. ती 18 जून 2022 रोजी आयुष्याच्या 100 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. 18 जून रोजी पंतप्रधान मोदी एक दिवसीय गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. ते पावागड मंदिराला भेट देतील आणि नंतर वडोदरा येथे एका सभेला संबोधित करतील. या भेटीदरम्यान ते पंकज मोदींसोबत गांधीनगरमध्ये राहणाऱ्या त्यांच्या आईला भेटण्याची शक्यता आहे. मोदी कुटुंबीयांनी त्या दिवशी अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिरात भंडारा आयोजित करण्याचेही नियोजन केले आहे.

पावागडमध्ये पीएम मोदी घेणार आशीर्वाद - सकाळी साडेनऊ वाजता पंतप्रधान मोदी पावागडच्या महाकाली मंदिरात जातील. आशीर्वाद घेण्यासाठी पावागडला जाण्यापूर्वी ते आई हिराबा यांची खास भेट घेणार आहेत. ते त्यांच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील. पावागड महाकाली मंदिर गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. गुजरात सरकारचे प्रवक्ते जितू वाघानी म्हणाले की, पंतप्रधान कदाचित 18 जून रोजी सकाळी त्यांच्या आईला भेटतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या आई हिराबा यांचा वाढदिवस वडनगरमध्ये मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. हिराबाच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त वडनगरमध्ये 18 जून रोजी प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, लोक विनोदी कलाकार गुणवंत चुडासामा, सुंदरकांड वक्ते केतन कमल आणि जितू रावल यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांच्या वाढदिवसानिमित्त हटकेश्वर महादेवातही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधानपदी विराजमान झाल्याच्या दोन वर्षानंतर हिराबा 15 मे 2016 रोजी नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीला गेल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना स्वतःच्या हाताने व्हील चेअरवर फिरवले होते. त्यानंतर पंतप्रधानांनी अनेक फोटोही ट्विट केले.

फेब्रुवारी २०१६ मध्ये रुग्णालयात दाखल-आई हिराबाची तब्येत फेब्रुवारी २०१६ मध्ये खालावली. त्यांच्यावर अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पंतप्रधान सतत डॉक्टरांच्या संपर्कात होते. आई बरी होत असतानाही ते तिच्याशी बोलत होते. हिराबा यांनी पंतप्रधान मोदींना फोनवर सांगितले की, त्यांना एकाच वेळी नवीन काळे केस आणि दात आले आहेत.

हेही वाचा :Agneepath scheme Protest : भारतीय सैन्यातील अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन.. बिहारमध्ये रेल्वे पेटवली

ABOUT THE AUTHOR

...view details