नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एका वेबिनारला संबोधित करणार आहेत. आज सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. या वेबिनारची थीम 'कौशल्य आणि शिक्षणाद्वारे युवा शक्तीचा वापर' ही आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकार कल्पना आणि सूचनांची अपेक्षा करत आहे. ज्यासाठी 12 पोस्ट बजेट वेबिनारची मालिका आयोजित केली जाणार आहे. पंतप्रधानांचा आजचा कार्यक्रम त्याच मालिकेचा एक भाग आहे.
वेबिनारमध्ये सहा ब्रेक आउट सत्रे : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेबिनारमध्ये कौशल्य आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांचा समावेश असलेली सहा ब्रेक आउट सत्रे असतील. संबंधित केंद्र सरकारच्या मंत्रालयांचे मंत्री आणि सचिवांव्यतिरिक्त, राज्य सरकारच्या शिक्षण आणि कौशल्य विभागातील अनेक भागधारक, उद्योग प्रतिनिधी, शाळा आणि विद्यापीठांचे विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापक, शिक्षण आणि संशोधन संस्था, कौशल्य विकास संस्था, क्षेत्रीय संस्था स्किल कौन्सिल, आईटीआई, फिक्की, सीआयआय, नॅसकॉम इत्यादी वेबिनारमध्ये सहभागी होऊन त्यांच्या सूचना देतील.
सर्वसमावेशक विकासाला सरकारचे प्राधान्य : प्रधान मंत्री कौशल विकास योजना 4.0, स्किल इंडिया डिजिटल प्लॅटफॉर्म, स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नॅशनल अॅप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम आणि नॅशनल डिजिटल लायब्ररी आणि मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी शिक्षक प्रशिक्षण या ब्रेकआउट सत्रांच्या थीम आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात सात प्राधान्यक्रम स्वीकारण्यात आले आहेत. जे एकमेकांना पूरक असल्याचे म्हटले जाते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सर्वसमावेशक विकास हे सरकारच्या प्राधान्यक्रमांपैकी एक असल्याचे म्हटले होते. त्या म्हणाल्या होत्या की, केंद्रीय अर्थसंकल्पातील सात प्राधान्यक्रम 'सप्तऋषी' म्हणून काम करतील आणि आम्हाला मार्गदर्शन करतील. शिक्षण आणि कौशल्य विकास हे त्यापैकीच एक आहे.
अमित शाह बिहार दौऱ्यावर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. सहा महिन्यात अमित शाह तिसऱ्यांदा बिहारला भेट देणार आहेत. आपल्या बिहार दौऱ्यात अमित शाह भाजप कार्यकर्त्यांना पक्षाच्या राज्यातील पुढील रणनितीविषयी मार्गदर्शन करणार आहेत. राज्यात भाजप एकटे लढण्याच्या शक्यतांची देखील चाचपणी करतो आहे. तसेच आपल्या दौऱ्यात अमित शाह राज्यभरातील विविध कार्यक्रमात शेतकऱ्यांशी आणि मजुरांशी संवाद साधणार आहेत.
हेही वाचा :Shelly Oberoi : महापौर शेली ओबेरॉय यांनी मध्यरात्री गाठले पोलिस स्टेशन, भाजप नगरसेवकांवर धक्काबुक्कीचा आरोप केला