नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वातावरण परिषदेच्या कॉर्पोरेशन ऑफ पार्टीजमध्ये (COP26) सहभागी झाले आहेत. ही परिषद स्कॉटलंडमधील ग्लासगो शहरात ३१ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियाने कोव्हॅक्सिनला मान्यता दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रिलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचे आभार मानले आहेत.
COP26 मध्ये जागतिक नेते सहभागी झाले आहेत. या परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले, की आम्ही आमच्या धोरण आणि विकासांमधील मुख्य भागात अनुकूल बदल केले आहेत. भारतामध्ये नल से जल, स्वच्छ भारत मोहिम आणि उज्जवला योजनेने नागरिकांना फायदा मिळाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या राहणीमानात सुधारणा झाली आहे.
हेही वाचा-संरक्षण विभागासाठी एक मजबूत शस्त्र बनू शकतो 'ROBO Xena 5.0'
अनेक पांरपरिक समुदायांना एकतेने निसर्गासोबत राहण्याचे ज्ञान होते. हे ज्ञान पुढील पिढीपर्यंत जाण्यासाठी त्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करायला पाहिजे. स्थानिक भागाप्रमाणे जीवनशैलीचे संरक्षण असायला हवे. हा अनुकूलनामधील महत्त्वाचा भाग आहे.