नवी दिल्ली :देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. यामध्ये ते देशातील कोरोना परिस्थिती आणि लसीकरण मोहिमेचा आढावा घेतील.
या बैठकीमध्ये कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, केंद्रीय आरोग्य सचिव यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी हजर आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये देशात ९३ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. १९ सप्टेंबरनंतरची ही एका दिवसातील उच्चांकी रुग्णसंख्या असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.
हेही वाचा :स्त्री-पुरुष समानतेमध्ये भारताचे स्थान घसरले; बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि भूतानही पुढे