हैदराबाद: सर्व घराणेशाही पक्षांचा पाया भ्रष्टाचारात आहे. घराणेशाही असलेल्या काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार संपूर्ण देशाने पाहिला आहे. संपूर्ण तेलंगणा राज्यात बीआरएसने भ्रष्टाचाराची पातळी गाठली आहे. बीआरएस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष तेलंगणासाठी धोकादायक आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते वारंगल येथील एका सभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी वारंगलमध्ये 6,100 कोटी रुपयांच्या अनेक महत्त्वाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. कार्यक्रमांमध्ये सामील होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी प्रसिद्ध भद्रकाली मंदिराला भेट दिली.
पंतप्रधान मोदींचा या वर्षातील तेलंगणाचा तिसरा दौरा आहे. यापूर्वी ते जानेवारी आणि एप्रिलमध्ये तेलंगणात आले होते. भाजप पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राज्य युनिटचे नवनियुक्त अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी हे पंतप्रधानांच्या कार्यक्रमांच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ नेत्यांसह वरंगलला रवाना झाले. 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या काझीपेट या रेल्वे वॅगन उत्पादन युनिटची पायाभरणी करणार आहेत. या आधुनिक उत्पादन युनिटमध्ये प्रगत वॅगन उत्पादन क्षमता असणार आहे. त्यामुळे स्थानिक रोजगार निर्मितीला मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.