नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'च्या 83व्या भागात देशाला संबोधित करणार आहेत. 2021ची ही दुसरी शेवटची आवृत्ती असेल. शेतकरी आंदोलन आणि कायदे यासह कोणकोणत्या मुद्द्यांचा आजच्या मन की बातमध्ये आढावा असेल, याची उत्सुकता आहे.
३ ऑक्टोबर २०१४ प्रसारित झाला पहिला भाग
पंतप्रधान मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 'मन की बात' या मासिक रेडिओ कार्यक्रमाद्वारे देशवासीयांना संबोधित करतात. ऑल इंडिया न्यूज आणि मोबाइल अॅपसह ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन नेटवर्कवरही हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. पीएम मोदींनी शनिवारी ट्विट करून लोकांना रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' कार्यक्रम ऐकण्याचे आवाहन केले. 'मन की बात' या कार्यक्रमाचा पहिला भाग ३ ऑक्टोबर २०१४ रोजी प्रसारित झाला होता.
जमिनीचा डिजिटल रेकॉर्ड
24 ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या 'मन की बात'च्या भागात पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीवर भर दिला. त्याच वेळी, पंतप्रधान म्हणाले, की भारत जगातील अशा काही देशांपैकी एक आहे, जो ड्रोनच्या मदतीने आपल्या गावातील जमिनीचा डिजिटल रेकॉर्ड तयार करत आहे.