कलबुर्गी (कर्नाटक) : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, मोदी हे विषारी सापासारखे आहेत. ते कर्नाटकमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावरून आता मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, खरगे यांचे विधान सोनिया गांधींच्या ' मौत का सौदागर' या विधानापेक्षाही वाईट आहे.
मी त्यांच्यावर वैयक्तीक टीका केली नाही : खरगे म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे 'विषारी' सापासारखे व्यक्ती आहेत. जर कोणी त्याचा आस्वाद घेतला तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपने जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, खरगे यांचे विधान सोनिया गांधींच्या ' मौत का सौदागर' या विधानापेक्षाही वाईट आहे. तसेच, काँग्रेसने खरगे यांना अध्यक्ष केले. मात्र, त्यांचे कोणी ऐकत नाही, त्यामुळे ते लोकांना दिसावेत म्हणून विधाने करत राहतात, असे ठाकूर म्हणाले आहेत. दरम्यान, खरगे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की मी वैयक्तिकरित्या पंतप्रधान मोदींना चांगले मानतो. मी त्यांच्यावर वैयक्तीक टीका केली नाही. त्यांच्या विचारसरणीबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल बोललो आहे असही ते म्हणाले आहेत.