महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोदींच्या हस्ते महाकाली मातेच्या जीर्णोद्धार केलेल्या मंदिराचे उद्घाटन - मंदिराचे उद्घाटन

पंतप्रधानांनी महाकाली मातेच्या जीर्णोद्धार केलेल्या मंदिराचे उद्घाटन केले. महाकाली माता मंदिराच्या नव्याने बांधलेल्या शिखरावर सोन्याचा मुलामा असलेल्या ध्वजस्तंभावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पावागडचे हे मंदिर सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे.

मोदींच्या हस्ते महाकाली मातेच्या जीर्णोद्धार केलेल्या मंदिराचे उद्घाटन
मोदींच्या हस्ते महाकाली मातेच्या जीर्णोद्धार केलेल्या मंदिराचे उद्घाटन

By

Published : Jun 18, 2022, 11:17 AM IST

Updated : Jun 18, 2022, 12:08 PM IST

अहमदाबाद :पंतप्रधान नरेंद्र मोदी पावागडला पोहोचले आहेत. पावागड मंदिरातील महाकाली माता मंदिरात पंतप्रधानांनी दर्शन घेतले. यासोबतच पंतप्रधानांनी महाकाली मातेच्या जीर्णोद्धार केलेल्या मंदिराचे उद्घाटन केले.

मोदींच्या हस्ते महाकाली मातेच्या जीर्णोद्धार केलेल्या मंदिराचे उद्घाटन

मंदिराला सोन्याचा मुलामा - महाकाली माता मंदिराच्या नव्याने बांधलेल्या शिखरावर सोन्याचा मुलामा असलेल्या ध्वजस्तंभावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पावागडचे हे मंदिर सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर अत्यंत विलोभनीय असे आहे. त्याचा जीर्णोद्धार केल्याने ते अधिकच उठावदार दिसत आहे.

मोदींच्या हस्ते महाकाली मातेच्या जीर्णोद्धार केलेल्या मंदिराचे उद्घाटन


पंतप्रधानांचे मंदिराकडे लक्ष - मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन एप्रिलमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येतात. यापूर्वी 2017 मध्ये पंतप्रधानांनी मंदिराच्या पुनर्निर्मित भागाची पायाभरणी केली होती. आज या संपूर्ण मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.

मोदींच्या हस्ते महाकाली मातेच्या जीर्णोद्धार केलेल्या मंदिराचे उद्घाटन

हे महाकाली मंदिर अत्यंत सुरेख आहे. त्याची निर्मिती उच्च प्रतिच्या शिळांपासून करण्यात आली आहे. अत्यंत जुने मंदिर असल्याने त्याचे सुंदर पद्धतीने पुनर्निर्माण करुन जिर्णोद्धारित मंदिर तयार करण्यात आले आहे.

Last Updated : Jun 18, 2022, 12:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details