सिडनी :ऑस्ट्रेलिया आणि भारत आपल्या दोन्ही देशांमध्ये अक्षय ऊर्जेला चालना देण्यासाठी एकत्र काम करत आहेत. आपल्या दोन्ही देशांमध्ये आधीच इतकी घट्ट मैत्री आहे आणि आपल्या भारतीय-ऑस्ट्रेलियन समुदायाने खूप योगदान दिले आहे. पंतप्रधान मोदींसोबत आम्ही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध आणखी मजबूत करत आहोत, असे ट्विट ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी केले.
बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाची स्थापना : पंतप्रधान मोदी म्हणाले की, खाणकाम आणि खनिजांच्या क्षेत्रात आमचे धोरणात्मक सहकार्य मजबूत करण्यासाठी आम्ही रचनात्मक चर्चा केली. आम्ही ग्रीन हायड्रोजनवर टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी पुढे म्हणाले, मी पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि सर्व ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांना यावर्षीच्या क्रिकेट विश्वचषकासाठी भारतात आमंत्रित करतो. त्यावेळी, तुम्हाला भारतात दिवाळीचा भव्य उत्सवही पाहायला मिळेल. मोदींनी बंगळुरूमध्ये नवीन ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाची स्थापना केल्याची घोषणा केली आहे.
संयुक्त पत्रकार परिषद :पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सिडनी येथे दोन्ही देशांमधील सामंजस्य करारांची देवाणघेवाण केली. दरम्यान, आजच्या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही नेत्यांनी या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया-भारत व्यापक आर्थिक सहकार्य करार लवकर पूर्ण करण्याच्या त्यांच्या सामायिक महत्त्वाकांक्षेचा पुनरुच्चार केला. यानंतर पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली.