नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील 'मन की बात' या कार्यक्रमातून सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 82 वा भाग होता. पंतप्रधान मोदींनी कोरोना लसीकरण मोहीमेवर भाष्य केले. कोरोना लसीकरण मोहीम खूप यशस्वी झाली आहे. कोरोनाच्या काळात देशाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. आता देश नव्या ऊर्जेने पुढे जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
'मन की बात' मधील महत्त्वाचे मुद्दे -
कोरोना लसीकरणामध्ये 1 अब्ज डोसचा टप्पा पार केला आहे. देश नवीन उत्साह, नवीन उर्जा घेऊन पुढे जात आहे. लसीकरण मोहिमेने भारताची क्षमता दर्शवली. मला माझ्या देशाची, माझ्या देशातील लोकांची क्षमता चांगली माहिती आहे. आरोग्यसेवक देशवासीयांना लसीकरण करण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत, हेह माहित होते. लाखो आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच भारत 100 कोटी लसींच्या डोसचा टप्पा पार करू शकलो. त्यामुळे प्रत्येक भारतीयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, असे मोदी म्हणाले.
रांगोळीच्या माध्यमातून सणांमध्ये रंग भरण्याची परंपरा तर शतकांपासून आहे. रांगोळीत देशाच्या विविधतेचं दर्शन होत असतं. यासाठी सांस्कृतिक मंत्रालय याच्याशी जोडलेली एक राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणार आहे.