शिमला- पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी शिमला येथे ( PM Modi in Shimla ) पोहोचले. शिमल्यात त्यांनी पीएम किसान सन्मान निधीच्या 11व्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर ( PM Kisan Samman Nidhi ) हस्तांतरित केले. या 11व्या हप्त्यात 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 21 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले.
केंद्रातील मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शिमल्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पीएम मोदींव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ( Minister Anurag Thakur ) आणि हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर सहभागी ( Himachal Chief Minister Jai Ram Thakur ) झाले होते. शिमल्यात, पंतप्रधान मोदींनी देशभरात उपस्थित असलेल्या केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी ऑनलाईन चर्चा केली.
दरवर्षी 6 हजार रुपये खात्यावर होतात जमा-पीएम-किसान योजनेअंतर्गत ( PM KISAN scheme ) वर्षभरात पात्र शेतकऱ्याला 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम दर 4 महिन्यांनी प्रत्येकी 2 हजार रुपये अशी दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6 हजार रुपये तीन समान मासिक हप्त्यांमध्ये दिला जातो. हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जातो.