रणकपूर (राजस्थान)- दक्षिण राजस्थानच्या अरावली डोंगरातील रणकपूर भागात गुलाबी बिबट्या आढळून आला आहे. क्लाउड डिसूजा यांच्या रिपोर्टनुसार, याआधी २०१२ आणि २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत गुलाबी बिबट्या आढळून आले होते. या बिबट्याला इंग्रजीत पिंक लिपर्ड असे म्हणतात. हा अतिशय दुर्मिळ बिबट्या आहे.
राजस्थानमध्ये दिसला दुर्मिळ ''गुलाबी बिबट्या''
भारतात यापूर्वी १९१० मध्ये पांढरा बिबट्या दिसला होता. पांढरा बिबट्याही अतिशय दुर्मिळ आहे. या बिबट्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतरपासून भारतीय जंगलांमध्ये साधे आणि काळे बिबटे दिसू लागले होते. हा पांढरा बिबट्या कुठे गेला याची माहिती मिळाली नाही. रणकपूर आणि कुंभलगढ परिसरात राहणाऱ्या लोकांनी मात्र वेगळी माहिती दिली आहे. या भागात गुलाबी रंगाचे मोठे मांजर बघितले आहे. ते आकाराने मोठे असल्याने बिबट्यासारखे दिसते.

उदयपूरचे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर हितेश मोटवानी यांनी याबाबत पुष्टी दिली आहे. त्यांनी सांगितले की, या गुलाबी बिबट्याचे फोटो क्लिक केले आहेत. यासाठी ते चार दिवस जंगलात फिरत होते. या दरम्यान त्यांना हा बिबट्या दिसून आला. या बिबट्याचे वय ५ ते ६ वर्ष असण्याची शक्यता आहे.