महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजपशासित राज्यांकडूनही इंधन दरकपात, जाणून घ्या कोणत्या राज्यात किती दर?

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये केंद्र सरकारने कपात केली आहे. याशिवाय काही भाजपशासित राज्यांनीही पेट्रोल आणि डिझेलची दरकपात केली आहे. मात्र गेल्या 26 दिवसांत पेट्रोल 8.15 रुपयांनी महाग झाले होते. त्यामुळे या दरकपातीचा सामान्यांना किती दिलासा मिळाला यावरही चर्चा होत आहे. तर दुरीकडे राज्य सरकारने दरकपात का केली नाही अशीही चर्चा होत आहे.

केंद्रासह भाजपशासित राज्यांकडूनही इंधनावरील कर कमी, जाणून घ्या कोणत्या राज्यात किती दर?
केंद्रासह भाजपशासित राज्यांकडूनही इंधनावरील कर कमी, जाणून घ्या कोणत्या राज्यात किती दर?

By

Published : Nov 5, 2021, 12:56 PM IST

Updated : Nov 5, 2021, 1:08 PM IST

नवी दिल्ली :पेट्रोल-डिझेलच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर इंधनावरील केंद्रीय एक्साईज ड्युटीत कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे पेट्रोल पाच रुपये तर डिझेलमध्ये दहा रुपयांची दरकपात झाली. यानंतर काही भाजपशासित राज्यांनीही पेट्रोल व डिझेलवरील आपला कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातही पेट्रोल-डिझेलचे दर आणखी कमी होणार का अशी चर्चा होत आहे.

नव्या दरकपातीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल 103.97 रुपये प्रति लिटर झाले आहे. तर मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर झाले आहे. तर दिल्लीत डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर झाले आहे.

सोमैयांचे ट्विट

भाजप नेते किरीट सोमैयांनी ट्विट करून राज्य सरकारने इंधनावरील संपूर्ण कर माफ करण्याची मागणी केली आहे. "महाराष्ट्र सरकार प्रती लिटर पेट्रोलला ₹29.98 राज्य कर घेत आहे. ठाकरे सरकार ते माफ करणार आहे का!!?? शिवसेना काँग्रेस NCP नी हा कर माफ केला तर पेट्रोल 79 रूपये लिटर मिळेल" असे ट्विट सोमैयांनी केले आहे.

महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

शहराचे नाव
पेट्रोल
डिझेल
दिल्ली 103.97 86.67
मुंबई 109.98 94.14
कोलकाता 104.67 89.79
चेन्नई 101.40 91.43

यूपीत पेट्रोल आणि डिजल 12 रुपयांनी स्वस्त

उत्तर प्रदेश सरकारनेही पेट्रोलचे दर 7 रूपयांनी कमी केले आहे. त्यामुळे युपीत पेट्रोलची किंमत 12 रूपयांनी कमी झाली आहे. याशिवाय युपी सरकारने डिझेलवरील कर दोन रुपयांनी कमी केला आहे. त्यामुळे युपीत डिझेल 12 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे युपीत पेट्रोल आणि डिझेल 12 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

भाजपशासित 9 राज्यांमध्ये पेट्रोल आणखी स्वस्त

आसम, त्रिपुरा, मणिपुर सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर प्रत्येकी सात रुपयांनी कमी केला आहे. त्यामुळे या राज्यांत पेट्रोल 12 रुपयांनी तर डिझेल 17 रुपयांनी स्वस्त झाले आहे. गुजरात, कर्नाटक, गोवा सरकारनेही पेट्रोल व डिझेलवरील कर सात रुपयांनी कमी केला आहे. त्यामुळे इथेही पेट्रोल 12 रूपये तर डिझेल 17 रुपयांनी स्वस्त झाले आहे. उत्तराखंड सरकारने मात्र पेट्रोलवरील कर केवळ दोन रुपयांनी कमी केला आहे. तर डिझेलवरील कोणताही कर कमी केला नाही. त्यामुळे इथे पेट्रोल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेल केवळ दहा रुपयांनी स्वस्त झाले आहे. बिहार सरकारनेही पेट्रोलवरील 1.30 पैसे कर कमी केला आहे. तर डिझेलवरील 1 रूपये 90 पैसे कर कमी केला आहे. गुजरात सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर सात रुपयांनी कमी केला आहे.

26 दिवसांत पेट्रोल 8.15 रुपयांनी महाग

सप्टेंबरच्या अखेरीस पेट्रोलचे दर वाढण्यास सुरूवात झाली होती. तेव्हापासून सातत्याने पेट्रोलचे दर वाढतच गेले. गेल्या 26 दिवसांत पेट्रोल 8.15 रुपयांनी महाग झाले होते. तर गेल्या 29 दिवसांत डिझेलचे दर 9.35 रुपयांनी वाढले होते.

दररोज वाढतात पेट्रोल आणि डिझेलचे दर

परदेशी चलन दर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या किंमतींच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपटेड केले जातात. तेल मार्केटिंग कंपन्या किंमतींच्या समीक्षेनंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम और हिंदुस्तान पेट्रोलियम या तेल कंपन्या दररोज विविध शहरांतील पेट्रोल और डिझेलच्या किंमती अपडेट करतात.

जाणून घ्या, तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर

पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel) दर दररोज अपडेट केले जातात. तुम्ही केवळ एका SMS च्या माध्यमातून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. यासाठी इंडियन ऑयल (IOCL) च्या ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर मेसेजे पाठवावा लागतो.

Last Updated : Nov 5, 2021, 1:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details