श्रीनगर -जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती ( PDP President Mehbooba Mufti ) यांनी अमरनाथ यात्रे दरम्यान यात्रेकरूंसाठी प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांवर आणि पुरवल्या जाणाऱ्या सुविधांवर चिंता व्यक्त केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अमरनाथ यात्रे ( Amarnath Yatra ) तील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा आणि वाहतुकीला विशेषत: मालवाहू वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे.
मेहबूबा यांनी ट्विटरवर ( Mehbooba Twitte )म्हटले आहे की, "काश्मीरमध्ये शेळ्या आणि मेंढ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची वाहतूक थांबवली ( Trucks carrying goats and sheep stopped ) आहे. त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास ( people facing problem ) होत आहे." प्रशासन याची दखल घेईल आणि ईदच्या पार्श्वभूमीवर मालवाहू ट्रकची वाहतूक व्यवस्थित करेल, अशी आशा आहे. असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.