महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Makar Sankranti - मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांच्या सूचना पाळा - रचकोंडा पोलीस आयुक्त महेश भागवत - सुरक्षा नियम पोलीस आयुक्त महेश भागवत

संक्रांती निमित्त रचकोंडा पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी नागरिकांना सुरक्षेबाबत आवाहन केले आहे.

Rachkonda Police CP Mahesh Bhagwat
रचकोंडा पोलीस आयुक्त महेश भागवत

By

Published : Jan 10, 2022, 10:44 PM IST

हैदराबाद -संक्रांती निमित्त रचकोंडा पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी नागरिकांना सुरक्षेबाबत आवाहन केले आहे. भागवत यांनी नागरिकांनी आगामी संक्रांती सणासाठी आपल्या गावी निघताना आपल्या मौल्यवान वस्तू घरी सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांनी दिलेल्या सूचनांनुसार योग्य खबरदारीच्या उपायांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर रचकोंडा पोलीस आयुक्तालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

माहिती देताना पोलीस आयुक्त महेश भागवत

हेही वाचा -Saina On Siddharth Tweet : सिद्धार्थच्या ट्विटवर सायनाची प्रतिक्रिया; म्हणाली, अभिनेता म्हणून आवडायचा पण...

प्रवास योजनांबद्दलचा तपशील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उघड केल्याने चोरी होऊ शकते, असे मत भागवत यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी नागरिकांना तसे न करण्याचा इशारा दिला आहे.

सुरक्षेसाठी दिल्या 'या' सूचना

भागवत यांनी घरात सेंट्रल लॉक सिस्टीमची व्यवस्था करणे, पादत्राणे मुख्य दरवाज्यासमोर ठेवणे, बाहेरील गेट आतून बंद करणे, घराच्या समोरच्या खोलीचे दिवे लावणे आणि शेजारी किंवा विश्वासू व्यक्तींना प्रवासाबद्दल माहिती देणे इत्यादी अनेक सूचना दिल्या.

लोकं आवश्यक असल्यास प्रवासाबद्दल जवळपासच्या पोलिसांना माहिती देऊ शकतात, असे भागवत म्हणाले. त्याचबरोबर, त्यांनी सर्वांना सीसीटीव्हीचे महत्त्व लक्षात आणून दिले आणि शक्य असल्यास सीसीटीव्ही घराच्या परिसरात किंवा वसाहतींमध्ये बसविण्याचा सल्ला दिला.

नागरिकांनी आपल्या गावी जाताना सोने, दागिने, रोख रक्कम यांसारख्या मौल्यवान वस्तू घरात ठेवू नका, असा इशारा देखील भावत यांनी दिला.

भागवत यांनी नागरिकांना कोविड - 19 मार्गदर्शक तत्त्वे पाळण्याची आणि बस, ट्रेन किंवा कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना सुरक्षित राहण्यासाठी एसएमएस (सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग) चे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या.

भागवत यांनी ऑमायक्रॉनमुळे कोविडचा झापट्याने वाढलेला संसर्ग आणि रुग्णसंख्येबद्दल नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा -Minister Michael Lobo has Resigned : भाजप मंत्री मायकल लोबो यांचा राजीनामा

ABOUT THE AUTHOR

...view details