महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Air India Urination Case : मुंबई -दिल्ली विमानात प्रवाशाने किळसवाण्याचा प्रकाराची हद्दच ओलांडली..विमातळावर झाली अटक - मुंबई दिल्ली विमान

एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाने लघवी आणि शौच केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विमानाच्या कॅप्टनने तक्रार दाखल केल्यामुळे या प्रवाशाला अटक करण्यात आली.

Air India Urination Case
एअर इंडिया विमानाचे संग्रहित छायाचित्र

By

Published : Jun 27, 2023, 7:34 AM IST

Updated : Jun 27, 2023, 7:55 AM IST

नवी दिल्ली :एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाने शौचालयात न जाता सीटवरच लघवी आणि शौच केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. मुंबईहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या एआयसी 866 या विमानात 24 जूनला हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी एअर इंडियाच्या कॅप्टनने दिल्लीतील आयजीआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यामुळे आरोपी विमान प्रवाशाला अटक करण्यात आले आहे. पुढील तपास इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. दरम्यान या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

प्रवाशाची माहिती ठेवली गोपनीय :मुंबईवरुन दिल्लीला जाणाऱ्या विमानात प्रवाशाने सीटवरच लघवी आणि शौच केल्याने मोठी खळबळ उडाली. ही घटना उजेडात आल्यानंतर विमानाच्या कॅप्टनने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर प्रवाशाला अटक करण्यात आली. मात्र सध्या तरी पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तसेच आरोपी प्रवासी कूक असून तो ऑफ्रिकेत नोकरी करत असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. ही घटना 24 जूनला मुंबई ते दिल्ली या एआयसी 866 या विमानात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सोशल माध्यमात रंगतदार चर्चा :विमानातील सीटवरच लघवी आणि शौच केल्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही नागरिक सीट बेल्टमुळे प्रकार घडल्याचे सांगत आहेत, तर काही विमान कंपनीच्या अवस्थेकडे बोट दाखवत आहेत. फक्त एअर इंडियाच्या फ्लाइटमध्येच असे का होत आहे, असे काहींचे म्हणणे आहे. काही लोकांनी एअर इंडियाला अशा हवाई प्रवाशांवर कठोर कारवाई करावी असे सांगितले आहे.

यापूर्वीही घडली होती घटना :विमानात प्रवाशाने लघवी केल्याची घटना यापुर्वीही घडली होती. एका प्रवाशाने जानेवारी महिन्यात महिलेच्या कपड्यांवर लघवी केल्याचा प्रकार घडला होता. जानेवारी महिन्यात पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ही धक्कादायक घटना उघडकीस आली होती. लघवी करणारा आरोपी प्रवाशी हा मुंबईचा रहिवासी होता. या प्रकरणी आयजीआय विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला बंगळुरू येथून अटक केली होती. आरोपी एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता, मात्र या घटनेमुळे त्याची नोकरीही गेली होती.

हेही वाचा -

  1. Indian Urinating In Flight : भारतीयाने केली अमेरिकन एअरलाइनच्या विमानात लघुशंका!
  2. Urination In Flight : विमानात लघुशंकेच्या घटनेनंतर एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस
Last Updated : Jun 27, 2023, 7:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details