महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NDA Vs INDIA : ना इकडे ना तिकडे; देशातील 'हे' पक्ष अद्याप तटस्थ - एनडीए बैठक दिल्ली

मंगळवारी एनडीए आणि यूपीए या दोघांच्याही बैठका झाल्या. एनडीएच्या बैठकीला 38 पक्ष हजर होते, तर यूपीएच्या बैठकीला 26 पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. या दोन्ही बैठकांना देशातील काही पक्षांनी उपस्थिती लावली नाही. त्यामुळे येत्या काळात त्यांची भूमिका महत्वाची असल्याचे राजकीय तज्ञ सांगतात.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jul 18, 2023, 10:37 PM IST

नवी दिल्ली - देशातील बीजेडी, वायएसआरसीपी, बीआरएस, टीडीपी आणि बसपा या पक्षांनी सध्यातरी आपला पाठिंबा अजून जाहीर केलेला नाही. त्यामुळे ते सध्या एनडीएमध्ये नाहीत आणि यूपीएमध्येही सहभागी झाले नाहीत. त्यामुळे त्यांची अधिकृत भूमिका अजून स्पष्ट झाली नाही. त्यामुळे आता दोन्ही आघाडीत सहभागी पक्ष त्यांचे मन आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न केले जात आहे.

कोणाकडे किती पक्षांचे पाठबळ - 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांसाठी मंगळवारचा दिवस खूप खास होता. दोन्ही आघाड्यांनी आपापल्या घटक पक्षांची बैठक घेतली आहे. आता INDIA असे नामकरण केलेल्या UPA मध्ये 26 पक्ष सहभागी आहेत, तर NDA कडे 38 पक्ष आहेत. मात्र, अजूनही चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. असे काही पक्ष आहेत ज्यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही आणि हे पक्ष आपापल्या राज्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या सर्व पक्षांची भूमिका येत्या काळात एनडीए किंवा यूपीएला मजबूत करण्यासाठी महत्वाची आहे अशी चर्चा आहे.

या पक्षांची भूमिका महत्वाची - या दोन्ही आघाड्यांच्या बैठकीला जे पक्ष हजर राहिले नाहीत, त्यांनी यापैकी कोणत्याही युतीचा निर्णय अद्याप घेतला नाही. त्यामुळे त्यांची भूमिका येत्या काळात महत्वाची आहे. या पक्षांमध्ये बिजू जनता दल (ओडिशा), वायएसएआरसीपी (आंध्र प्रदेश), टीडीपी (आंध्र प्रदेश), बीआरएस (तेलंगाणा) आणि बसपा (यूपी) यांचा समावेश आहे. टीडीपी आणि बसपा वगळता बाकीचे पक्ष आपापल्या राज्यात नेतृत्व करत आहेत.

लोकसभेचे गणित - ओडिशात बीजेडी, आंध्र प्रदेशात वायएसआरसीपी आणि बीआरएस हे तेलंगणातील सत्ताधारी पक्ष आहेत. हे सर्व पक्षही मजबूत आहेत. ओडिशात लोकसभेच्या 21, आंध्र प्रदेशात 25 आणि तेलंगणामध्ये 17 लोकसभेच्या जागा आहेत. या तिन्ही राज्यात एकूण 63 जागा लोकसभेच्या आहेत. 2019 मध्ये भाजपला ओडिशात आठ आणि तेलंगाणात चार जागा मिळाल्या होत्या. तर आंध्र प्रदेशात भाजपचे खातेही उघडता आले नाही. त्यामुळे भाजप आता आंध्र प्रदेशावर जास्त लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा -

  1. NDA Meeting : NDA च्या बैठकीत एकनाथ शिंदे, अजित पवारांना पहिल्या रांगेत स्थान, मोदींनी सांगितला NDA चा नवा अर्थ
  2. INDIA VS NDA : विरोधी आघाडीत मतभेद, तर एनडीएतही कुरबुरी; कोणाचे किती बलाबल?
  3. INDIA VS NDA : 'दम असेल तर INDIA ला चॅलेंज करा!', विरोधी पक्षाच्या बैठकीनंतर कोण काय बोललं जाणून घ्या..

ABOUT THE AUTHOR

...view details