होशंगाबाद (भोपाळ)- वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण आज दुपारी ३.१५ ते सायंकाळी ६.२३ या वेळेत होणार आहे. ते आपल्या येथून दिसणार नाही. सुपरमुनचे मनोहारी दर्शन सर्वांना घ्यावे, यासाठी महाराष्ट्रातील वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्राच्यावतीने ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज रात्री ८.३० वाजता नेहरू विज्ञान केंद्राचा ऑनलाईन कार्यक्रम सुरू होईल. रात्री ९ वाजेपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात खगोलप्रेमींनी सुपरमूनचे दर्शन ऑनलाईन घेता येईल. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने सूपरमूनचे दर्शन संपूर्ण देशात होणार आहे.
२६ मे रोजी बुद्ध पौर्णिमेला चंद्राचे खास दर्शन होणार आहे. पौर्णिमेचा हा चंद्र पृथ्वीवरून वेगवेगळ्या ठिकाणी हा वेगवेगळ्या स्वरुपात दिसणार आहे. ऑस्ट्रेलियात पूर्ण चंद्रग्रहण (टोटल लुनार एकलिप्स) होत असल्याने ब्लड मूनच्या स्वरुपात चंद्रदर्शन होणार आहे.
भारताच्या पूर्वेकडे असलेल्या राज्यांत अंशत: लूनार एक्लिप्स आणि मध्य प्रदेशमध्ये उपछाया चंद्रग्रहण हे (पेनुमब्रल लुनार एक्लिप्स) चंद्रोदयाच्या काही मिनिटात दिसणार आहे. चंद्रग्रहणाची पूर्ण माहिती राष्ट्रीय विज्ञान प्रसारक सारिका घारू यांनी सांगितले, की मध्यप्रदेशमधील पूर्वेकडील जिल्ह्यात सिंगरोली रीवा अनूपपूरमध्ये चंद्रोदय जवळपास ३५ मिनिटे दिसणार आहे. तर भोपाळमध्ये १७ मिनिटे दिसणार आहे.