महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

फेसबुक अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन उपस्थितीला संसदीय समितीचा नकार; प्रत्यक्ष आल्यास 'ही' ऑफर

फेसबुक कंपनीच्या नियमानुसार अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बैठकीत घेण्यास निर्बंध असल्याचे उत्तर फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी संसदीय समितीला दिले. त्यावर संसदीय समितीने ज्या अधिकाऱ्यांना फेसबुक पाठविण्यात येणार आहे, त्यांची यादी द्यावी, असे फेसबुकला निर्देश दिले आहेत.

Facebook
फेसबुक

By

Published : Jun 19, 2021, 10:47 PM IST

नवी दिल्ली - संसदीय समितीसमोर ऑनलाईन उपस्थित राहण्याची फेसबुक कंपनीची विनंती माहिती तंत्रज्ञानावरील स्थायी समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी फेटाळली आहे. कोरोनाच्या काळात कंपनीच्या धोरणाप्रमाणे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याऐवजी ऑनलाईन उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी, अशी फेसबुकने संसदीय समितीला विनंती केली होती. त्यावर संसदीय समितीने उपस्थित राहणाऱ्या फेसबुकच्या अधिकाऱ्यांचे लसीकरण करण्याचा प्रस्ताव दिल्याचे सुत्राने सांगितले.

युट्यूब, गुगलसह सर्व सोशल मीडिया आणि वेब प्लॅटफॉर्मने त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष पाठवावेत, अशा सूचना संसदीय समितीने दिल्या आहेत. संसदीय समितीपुढे फेसबुकच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची तारीख निश्चित झाली नाही.

हेही वाचा-अरुणाचलच्या सीमेलगत चीनच्या पायाभूत प्रकल्पांचे काम सुरू - माजी खासदार निनाँग एरिंग

समितीपुढे उपस्थित राहणाऱ्या फेसबुक अधिकाऱ्यांचे लसीकरण करू- संसदीय समिती

फेसबुक कंपनीच्या नियमानुसार अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बैठकीत घेण्यास निर्बंध असल्याचे उत्तर फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी संसदीय समितीला दिले. त्यावर संसदीय समितीने ज्या अधिकाऱ्यांना फेसबुक पाठविण्यात येणार आहे, त्यांची यादी द्यावी, असे फेसबुकला निर्देश दिले आहेत. त्या अधिकाऱ्यांचे समितीकडून लसीकरण करण्यात येईल. तसेच त्यांना समितीपुढे उपस्थित राहण्यासाठी पुरेसा वेळही देईल, अशी संसदीय समितीने भूमिका घेतल्याचे सूत्राने सांगितले. यावर फेसबुकच्या अधिकाऱ्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा-अबब...अपत्य जन्माला घालण्यास गोंदियाकरांचा नकार का? वाचा कारण...

ट्विटरचे अधिकारीही संसदीय समितीपुढे राहिले हजर

नुकतेच संसदीय समितीपुढे ट्विटरचे अधिकारी उपस्थित राहिले होते. कंपनीच्या नियमांना महत्त्व द्या, स्थानिक नियमांना महत्त्व देऊ नका, असे सांगण्यात आल्याचे ट्विटरच्या अधिकाऱ्यांनी संसदीय समितीला सांगितले आहे. त्यावर संसदीय समितीने ट्विटरच्या अधिकाऱ्यांना लेखी उत्तरे देण्याच्या सूचना केल्या आहेत.

दरम्यान, समाज माध्यमांचा गैरवापर आणि महिलांची सुरक्षा याबाबत संसदेच्या माहिती तंत्रज्ञानावरील स्थायी समितीने यापूर्वी चिंता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर समितीकडून समाज माध्यमांना म्हणणे मांडण्याचे निर्देश समितीने दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details