महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

parliament winter session : राज्यसभेत प्रचंड गदारोळ; कामकाज सोमवार पर्यंत तहकूब - राज्यसभेचे कामकाज सोमवार पर्यंत तहकूब

आज खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ झाला. यानंतर राज्यसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा (parliament winter session) आज 15 वा दिवस होता.

session : राज्यसभेत प्रचंड गदारोळ; कामकाज सोमवार पर्यंत तहकूब
parliament winter session

By

Published : Dec 17, 2021, 5:34 PM IST

नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा (parliament winter session) आज 15 वा दिवस होता. खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ झाला. यानंतर राज्यसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. त्याचवेळी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात खासदारांनी अनेक मुद्दे उपस्थित केले.

राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ पाहून सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृह तहकूब करण्याची घोषणा केली. तसेच चर्चा करून समस्या सोडवण्याचे आवाहन केले.

प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी कोविड-19 दरम्यान कुपोषणाच्या पातळीत वाढ झाल्याबद्दलच्या प्रश्नाला उत्तर दिले. महिला आणि बालकांना अन्न उपलब्ध होईल याची खात्री केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष रमेश कुमार (Congress Congress MLA Ramesh Kumar Rape Comment ) यांनी गुरुवारी विधानसभेत बलात्कारावर लाजिरवाणी टीप्पणी केली. या संसद सदस्यांनी निषेध नोंदवला.

ABOUT THE AUTHOR

...view details