नवी दिल्ली: बुधवारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत गदारोळ घातल्यामुळे दुपारी दोन वाजे पर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्या नंतरही विरोधकांचा गोंधळसुरु राहिल्यामुळे अखेर लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले तर विरोधकांच्या गदारोळातच राज्यसभेचे कामकाज सुरूच आहे
केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले की, राज्यसभेच्या अध्यक्षांनी मणिपूरवर चर्चेसाठी नोटीस स्वीकारली आहे आणि नावे मागितली आहेत असे सांगताच आम्ही बोलू लागलो, पण त्यांनी म्हणजे विरोधकांनी नियमाचा हवाला देत सबब सांगितली. याचा अर्थ ते केवळ सबबी सांगत आहेत आणि त्यावर चर्चा करण्यात त्यांना रस नाही. दुसरे म्हणजे, लोकसभेत दिल्ली संबंधी महत्त्वाचे विधेयक मांडले जाईल, त्यामुळे त्यावर आज चर्चा होईल.
आज लोकसभेत दिल्ली सरकार सुधारणा विधेयक मांडण्यात येणार होते. परंतु विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. तसेच मणिपूरच्या घटनेवरुन विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. या गदारोळामुळे लोकसभा अध्यक्षांनी दोन वाजेपर्यंत संसदेचे कामकाज तहकूब केले आहे. नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली सरकार सुधारणा विधेयक-2023 मध्ये काही बदल केले जाणार आहेत. हे विधेयक बदलांसह लोकसभेत सादर करण्यात आले. मात्र विरोधकांचा गोंधळ न थांबल्यामुळे अखेर कामकाज उद्या पर्यंत तहकुब करण्यात आले आहे.