नवी दिल्ली : संसदेच्या 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरू आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत खास निळ्या रंगाचे जॅकेट घालून पोहोचले. हे जॅकेट सिंगल यूज प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान मोदी दुपारी ३ वाजता लोकसभेत उत्तर देण्याची शक्यता आहे.
28 सिंगल यूज प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर : सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंगळुरू येथे आयोजित भारत ऊर्जा सप्ताहाचे उद्घाटन करण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वतीने हे जॅकेट पंतप्रधान मोदींना भेट देण्यात आले. हे जॅकेट 28 सिंगल यूज प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून बनवले आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने ते तयार केले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने 100 दशलक्ष बाटल्यांच्या पुनर्वापराचे लक्ष्य ठेवले आहे. हे जॅकेट पेट्रोल पंपावरील सहाय्यकांना देण्यात येणार आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील प्रस्तावावर संसदेत चर्चा सुरू आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दलितांबाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, आम्ही अनुसूचित जातींना हिंदू मानतो, मग त्यांना मंदिरात जाण्यापासून का रोखता, जर जात असेल तर त्यांना समान दर्जा का देत नाही. अनेक मंत्री त्यांच्या घरी जाऊन जेवायला जातात आणि फोटो काढून सांगतात की आम्ही त्यांच्या घरी जेवलो.